Easy Cooking Hacks For Every Working Woman: सध्याच्या काळात पुरूषासोबतच घरांतील स्त्री देखील वर्किंग वुमन बनली आहे. ती देखील तितक्याच जिद्दीने व हिंमतीने पैसे कमविण्यासाठी, स्वतःचे करियर घडवण्यासाठी घराबाहेर पडते. अशा परिस्थिती घर आणि ऑफिस सांभाळताना तिची तारेवरची कसरत होते खरी. परंतु घरांतील स्त्री या दोन्ही जबाबदाऱ्या अतिशय लिलया पेलून नेते. काही वर्किंग वुमन घरातील इतर काम पाहण्यासाठी कामवाली बाई ठेवतात किंवा काही महिला स्वतःच सगळी काम करतात. एकाच वेळी घरांतील काम, स्वयंपाक बनवणे, मुलांकडे लक्ष देणे, ऑफिसचे टार्गेट पूर्ण करणे अशा हजारो कामांचे ओझे तिच्या डोक्यावर असते. त्या अनेकदा आवड असूनही नोकरी करणाऱ्या महिलांना किचनमध्ये आपल्या आवडीची डिश बनवणं हे थकवणारं काम वाटतं. खासकरून दिवसभर काम करून घरी आल्यावर अनेकदा वर्किंग वुमनना किचनमध्ये जाण्याचा कंटाळा येतो. तसेच रोज समोर उभा राहणार प्रश्न असतोच की आज काय बनवायचं? जर आपण देखील वर्किंग वुमन असाल आणि सकाळी स्वयंपाक करताना आपला देखील गडबड, गोंधळ होत असेल तर काही सोप्या टिप्स वापरुन पाहू
आठवड्याभराचे मेन्यू प्लॅनिंग :- जे पदार्थ येत्या आठवड्यात बनवायचे असतील त्याच प्लॅनिंग विकेंडलाच करुन घ्यावे. हे प्लॅनिंग झाल्यानंतर ते पदार्थ बनवण्यासाठी लागणाऱ्या पदार्थांची एक यादी तयार करावी. विकेंडला सामानाची खरेदी करताना या लागणाऱ्या सर्व वस्तूंची एकदाच खरेदी करावी. यामुळे आपल्या डोक्यात आठवड्याभराचा मेन्यू लक्षात राहील आणि आपल्याकडे आवश्यक सामानही घरातच उपलब्ध असेल. त्यामुळे वेळही वाचेल. विकेंडला २ – ३ तासांसाठी केलेल्या प्लॅनिंगमुळे आठवडाभर काय बनवायचे असा प्रश्न आपल्याला पडणार नाही. तसेच मेन्यू लक्षात असल्यामुळे घाई – गडबड होणार नाही.
चांगल्या क्वालिटीचे चॉपर आणि सुरी वापरा
किचनमध्ये भाज्या किंवा फळं कापण्यासाठी चांगल्या क्वालिटीच्या चॉपर्सचा वापर करा, यामुळे तुमच्या कामाचा वेळ वाचेल आणि पटकन स्वयंपाक बनवून होईल.
मशिनचा उपयोग
किचनचं काम लवकर संपवण्यासाठी तुम्ही मिक्सर, ब्लेंडर किंवा प्रेशर कुकर यांसारख्या भांड्यांचा आणि मशिनचा वापर करू शकता. यामुळे काम लवकर होईल.
स्तू जागच्याजागी ठेवा
स्वयंपाकघरात वस्तू पसरवून ठेवू नका, तसेच स्वयंपाकासाठी लागणार्या वस्तू गॅसजवळ ठेवा, मगच स्वयंपाक सुरू करा. जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा वस्तू आणायला जावे लागणार नाही.
जास्त भांडी खराब होणार नाहीत याची काळजी घ्या
जर तुम्ही स्वंयपाक करताना अनावश्यक भांड्याचा जास्त वापर केला तर धुवायला सुद्धा जास्त भांडी जमा होतील. जसंजसं काम उरकेल तसं एक एक भाडं धुवा जेणेकरून जास्त भांडी गोळा होणार नाही.