पांढरा रंग जवळपास सर्वांनाच आवडतो. पण अनेकदा पांढरे कपडे परिधान केल्यानंतर त्यांना खूप सांभाळावं लागतं म्हणून अनेकजण ते परिधान करणं किंवा शक्यतो ते खरेदी करणंच टाळतात. जेव्हा तुम्ही पांढरे कपडे योग्य प्रकारे धुता तेव्हा ते पिवळ्या रंगापासून वाचू शकतात आणि त्याच वेळी त्यांची चमक देखील राखली जाते. तुम्ही सुध्दा पांढऱ्या कपड्यांची चमक आणि त्यांच्यावरील डाग दूर करू शकता. पांढऱ्या कपड्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी काही उपाय जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पांढरे कपडे धुण्याचा योग्य मार्ग

१. पांढरे कपडे वेगळे धुवा

पांढरे कपडे नेहमी वेगळे धुवा. अनेकजण अनेकदा पांढऱ्या रंगाचे कपडे हलक्या रंगाच्या कपड्यांसह मिसळतात आणि या प्रकरणात ते इतर रंगांमध्ये मिसळू शकतात. ही चूक करु नका.

२. कमी गरम पाण्यात कपडे भिजवा

पांढरे कपडे भिजविण्यासाठी कमी गरम असलेल्या पाण्याचा वापर करा. कपड्यांचे लेबल नेहमी ते कसे धुवावे हे सांगते. तुमचे पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्या सूचना वाचा. तसेच तुमचे हलके ओले कपडे ड्रायरमधून बाहेर काढा.

हे ही वाचा : वजन कमी करण्यात ‘हे’ सुके मेवे ठरू शकतात फायदेशीर, जाणून घ्या

कपडे पांढरे ठेवण्याचे उपाय

१. लिंबाचा वापर करा

पांढरे कपडे स्वच्छ करण्यासाठी लिंबाचा रस हा नैसर्गिक उपाय आहे आणि पांढऱ्या कपड्यांवर उत्तम काम करतो. ते वापरण्यासाठी कोमट पाणी वापरा आणि त्यात अर्धा कप लिंबाचा रस मिसळा. मग कपडे एक तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी धुवा.

२. ब्लीचिंग पावडर वापरा

पांढर्याब रंगाचे कपडे स्वच्छ करण्यासाठी ब्लीचिंग पावडरचा वापर केला जातो. तथापि, कॉटनचे कपडे स्वच्छ करण्यासाठी जास्त ब्लीच वापरू नका. असे केल्याने पांढरे कपडे देखील पिवळे होऊ शकतात.

३. व्हिनेगर वापरा

तुम्ही व्हाईट व्हिनेगर देखील वापरू शकता, ते लिंबाच्या रसासारखे काम करते. ते वापरण्यासाठी, १/२ कप पांढरा व्हिनेगर पाण्यात मिसळा, कपडे भिजवा आणि नंतर नेहमीप्रमाणे धुवा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy hacks white clothes turned yellow so follow these tricks to clean
Show comments