सध्या कोविड-१९ चा उद्रेक आपल्याला घर-बंदी होणे भाग पाडतो आहे. त्यामुळे आपले नेहमीचे दैनंदिन जीवन अमूलाग्र बदलण्याची मागणी करीत आहे. हा बदल आपल्याला अत्यंत कठीण आणि भीषण दिवस दाखविण्याची शक्यता आहे. आपल्या हातात असलेल्या गोष्टीवर नियंत्रण ठेवून आपली स्वतःची काळजी आपणच घेण्यासारख्या काही फायदेशीर सवयींवर लक्ष केंद्रीत करून हा बदल आपण सुसह्य करू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आपल्या दिवसाला योग्य आकार द्या

सध्याच्या नवीन परिस्थितीशी आपल्याला मिळते जुळते घेणे आवश्यक आहे. अशावेळी आपल्या दिवसाचे आयोजन आपण दैनंदिन वेळापत्रक आखल्याने आपल्याला प्रत्येक दिवस स्वनियंत्रित व अर्थपूर्ण वाटेल. आपल्याला ऑफिसचे काम किंवा शाळेचा गृहपाठ नसेल तर ह्याचे महत्त्व अधिक आहे. आपण आपले वेळापत्रक तयार करा आणण त्यात सकाळी उठणे, नित्यकामे पार पाडणे, व्हिडीओ मीटिंग्ज, व्यायाम आणि ज्या इतर कामात आपण व्यग्र असाल त्या सर्वांसाठी वेळ द्या. शक्य होईल तितके त्याचे पालन करा.

बातम्यांसाठी वेळेची मर्यादा पाळा

एखादी बातमी योग्य प्रकारे आकलन केल्यास आपल्याला सुसज्ज होण्यास मदत होते. परंतु संपूर्ण वेळ ताजी बातमी मिळवण्याच्या प्रयत्नातून आपल्याला चिंता आणि काळजी वाटू शकते. आपण ताज्या बातम्या दिवसातून किती वेळा मिळवता आणि प्रत्येकवेळी त्यासाठी किती वेळ घालवता यावर मर्यादा घालण्याचा प्रयत्न करा. आपला बातमी मिळवण्याचा स्त्रोत विश्वासार्ह असल्याची खात्री करून घ्या. या शिवाय आपण अधून-मधून थोडी विश्रांती घेऊन ताजे-तवाने झालात तर ते योग्यच आहे. त्याचबरोबर आपल्या प्रेमळ व्यक्तींशी प्रामाणिक राहणे व त्यांच्या बरोबर मर्यादा आखून घेणे हे सुद्धा योग्य आहे. आपल्याला चिंता वाटेल अशी अर्धवट माहिती वरचेवर देऊ नये असेही आपण आप्तेष्टांना सांगू शकता.

आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी सवड काढा

आपल्याला ताजेतवाने होण्यास मदत करतील अशा गोष्टी करण्यासाठी वेळ काढा. यामध्ये वाचन, रंगकाम, कला-निर्मिती, गायन, काव्य आणि घरात बसून जोपासण्याचा कोणताही छंद या गोष्टी येऊ शकतात. आपण आपल्या उत्तम मनःस्थितीत नसताना या सर्व गोष्टींना दुय्यम स्थान देण्याकडे आपला कल असतो.

माइंडफुलनेस अ‍ॅप्स आपल्याला खरोखर मदत करू शकतात का?

स्वास्थ्य मिळवण्याच्या तंत्रांचा सराव करा

दीर्घ श्वसन, एका पाठोपाठ एक या पद्धतीने स्नायूंना आराम देणे, चित्तशुद्धी (वर्तमान स्थितीवर लक्ष केंद्रित करणे) अशा स्वास्थ्य मिळवण्याच्या तंत्रांनी उत्तेजना व स्थैर्य मिळण्यास खूप मदत होते. आपल्याला मोबाईल किंवा संगणकावर विविध प्रकारच्या ध्यान-धारणेसंबंधी मार्गदर्शक अॅप्स आणि साइट्स उपलब्ध आहेत आणि त्यातून आपण आपल्याला योग्य वाटेल त्यांचा वापर करू शकतो.

परिस्थितीशी जोडलेले रहा

आपण विशेषत: जेव्हा कुटुंबियांपासून दूर एकटेच राहत असाल तेव्हा आपल्याला एकाकीपणा जाणवणे स्वाभाविक आहे. त्याचप्रमाणे घरात राहणे बंधनकारक असणे याचाच अर्थ आपण नेहमीच्या सामाजिक पद्धतीने लोकांशी जवळीक साधण्यास असमर्थ असणे हा आहे. पण अशावेळी आपण विविध प्रकारच्या नवीन पद्धती शोधन काढू शकता. व्हिडिओवरून मित्रांशी गप्पा मारणे, आभासी नोंदी, पत्र लिहिणे, ऑनलाईन खेळ खेळणे किवा कामे करणे, भोजन वेळ एकत्र घेणे किंवा एखादे साधे मदतीचे वाक्यसुद्धा आपल्याला व इतरांना एकमेकांशी जोडले जाण्यास मदत करू शकते.

नवमातेचे मानसिक आरोग्य

आपल्या शारिरीक आरोग्याची काळजी घ्या

आपल्याला कसे वाटते या गोष्टीवर आपले शारिरीक आरोग्य परिणाम करीत असते. जेव्हा शक्य असेल तेव्हा पौष्टिक अन्न खा, भरपूर पाणी प्या, चांगली झोप घ्या आणि काही व्यायाम, हालचाली करीत रहा. आपल्याला आवडणारे आणि घरातल्या घरात करता येणारे नाच, शरिराला ताण देणे, योगाभ्यास अशा प्रकारच्या व्यायामात स्वतःला गुंतवून घ्या.

याशिवाय, तुम्हाला जर खाद्यपदार्थ उपलब्ध होत असतील तर त्यांच्या सेवनाबाबत जागरूक रहा. एखाद्या पदार्थाचे अवाजवी सेवन क्षणिक आनंद देत असेल तरी त्यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होईल आणि अशी सवय घालवणे अवघड ठरू शकेल.

चिंता आणि त्रासदायक भावनांचे नियमन करा

सध्याच्या परिस्थितीत चिंता वाटणे, चिडचिड होणे, भीती वाटणे आणि अशा अनेक भावना उफाळून येणे अपरिहार्य आहे. त्यांचा स्वीकार करा आणि त्या उघड करा, त्यांचे नियमन करा. रोजनिशीत त्यांची नोंद करणे, विश्वासू मित्रांशी, कुटुंबातील व्यक्तींशी त्याबाबत बोलणे, त्यावर आधारित कलाकृती तयार करणे अशा काही गोष्टी आपण करू शकतो. पूर्वी कधीतरी अशा कठीण प्रसंगाला तोंड देताना आपल्या उपयोगी पडलेले कौशल्य आठवा आणि त्याचा ह्या प्रसंगी वापर करा.

जर आपल्याला खूप त्रासदायक वाटत असेल तर आपण आमच्या आय-कॉल व्यावसायिक समुपदेशक व भावनिक सहाय्यक (iCALL for professional counseling and emotional support) यांना फोन करू शकता. संपर्कासाठी माहिती खालीलप्रमाणे:

खास कोविड फोन क्र. +९१-९१५२९८७८२०. (सोम ते शनि. स. १०.०० ते सायं. ६.००)

आय कॉल: +९१-९१५२९८७८२१

ईमेल icall@tiss.edu

http://icallhelpline.org/covid-19/

बोला प्लेस्टोरवर nULTA अॅप

वेळः सोम-शनि सकाळी १०:०० ते रात्री ८:०० वाजता.