डोळ्यांना किंवा नजरेला त्रास होऊ लागला की चष्मा वापरणे अनिवार्य असते. लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही जास्त वेळ पाहणे, आहारात पौष्टिक घटकांची कमतरता, डोळ्यांची काळजी न घेणे, डोळ्यांना विश्रांती न देणे अशा कारणांमुळे अनेकदा डोळे कमकुवत होतात. आता तर लहान वयातच मुलांना चष्मा लागतो. अशावेळी सतत चष्मा लावल्यामुळे डोळ्यांजवळ काळे डाग (व्रण) पडतात. तुम्हालाही चष्म्यामुळे असे व्रण पडले असतील तर काही घरगुती उपायांनी तुम्ही हे व्रण कमी करू शकता. जाणून घेऊया या सोप्या टिप्स.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चष्म्याचे व्रण का येतात?

चष्म्याच्या नोझ स्टँडमुळे त्वचेवर सतत दाब पडतो, ज्यामुळे तेथील रक्ताभिसरण थांबते आणि तेथील त्वचा मृत होते. सतत चष्मा लावल्याने नाकाच्या त्या भागाच्या दोन्ही बाजूंना काळे व्रण पडतात. आणि जर उपचार केले नाहीत तर ते व्रण लवकर जात नाहीत.

‘या’ फळांच्या बिया ठरतात आरोग्यासाठी फायदेशीर; गंभीर आजारांवर आहेत गुणकारी

चष्म्याचे व्रण दूर करण्यासाठीचे काही सोपे उपाय :

  • ज्या ठिकाणी व्रण असतील त्या जागी कोरफडचा गर लावा आणि १० मिनिटे राहू द्या. त्यानंतर बोटांनी मसाज करून पाण्याने धुवा. कोरफडमध्ये असलेले अँटी-एजिंग घटक चट्टे व जळजळ दूर करतात.
  • काकडीचे लहान तुकडे कापून डोळ्यांवर ठेवा आणि १० मिनिटे कोरडे होऊ द्या. त्यानंतर डोळे पाण्याने स्वच्छ धुवा. काकडीमध्ये व्हिटॅमिन क असते, ज्यामुळे त्वचेला चमक येते. डाग कमी होतात.
  • या डागांवर लिंबाचा रस लावा आणि १० मिनिटे राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ करा. लिंबाच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि ब्लीचिंग गुणधर्म असल्याने डाग कमी होतात आणि चेहरा उजळतो.
  • याशिवाय, गुलाबपाणी, मध, टोमॅटोचा रस, बदामाचे तेल, संत्र्याच्या सालीपासून तयार केलेली पावडर, सफरचंद सायडर व्हिनेगर इत्यादी उपायांनीही चष्म्यांचे डाग होऊ शकतात.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. हे उपाय वापरण्याआधी तज्ञांकडून खात्री करून घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy home remedies to remove spectacle marks pvp
Show comments