diwali kandil making at home: सगळ्यांचा आवडता दिवाळी सण जवळ आला आहे. त्यानिमित्ताने बाजारात लगबग, लोकांची गर्दी सुरू झाली आहे. नवनवे आकाशकंदील, दिवे, नवनवीन तोरणे, रांगोळी अशा अनेक वस्तू बाजारात आल्या आहेत. अशातच दिवाळीआधीच अव्वाच्या सव्वा भाव लावणारे दुकानदार या सगळ्या वस्तू महागच विकतात आणि म्हणूनच सगळ्यांच्याच खिशाला त्या परवडणाऱ्या नसतात.

दिवाळीआधी नवनवीन कपडे, नवीन वस्तू आपण दरवर्षी खरेदी करतो. तसंच दरवर्षी नववीन आकाशकंदीलदेखील लोक खरेदी करतात. ट्रेंडिंग पॅटर्न, नवीन डिझाईन असलेला कंदील सगळ्यांनाच आकर्षित करतो. पण जुनं ते सोनं, असं म्हणतात ते काय चुकीचं नाही. दरवर्षी महागडा फॅशनेबल आकाशकंदील खरेदी करण्यापेक्षा घरच्या घरी कधीही ‘आउट ऑफ ट्रेंड’ न जाणारा आकाशकंदील तुम्ही बनवू शकता.

Gold Silver Today's Rate
Gold Silver Rate : सोनं ७८ हजारांच्या पार! खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या चांदीचा दर
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा
Bhaubeej 2024 Gift Ideas for Brothers and Sisters in Marathi
Bhaubeej 2024 Gift Ideas : यंदा तुमच्या बजेटनुसार द्या भावांना गिफ्ट! स्वस्तापासून महागड्यापर्यंत, पाहा एकापेक्षा एक हटके भेटवस्तू
Crunchy Potato Finger Recipe easy potato recipe for snack
बटाट्यापासून झटक्यात बनवा ‘क्रंची पोटॅटो फिंगर्स’, वाचा साहित्य आणि कृती
Gold-Silver Rate today | gold price gold rate
Gold Silver Rate : दसऱ्यानंतर सोने चांदीचे भाव घसरले, सोने खरेदी करायचा विचार करताय? जाणून घ्या आजचा भाव
Pet dog Minnie Travel in local train
“म्हणूनच मला मुंबई आवडते… ” बॅगमधून डोकावणाऱ्या मिन्नीला पाहून प्रवासी झाले खूश; VIRAL VIDEO पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू
Popular indian dessert deep fried khawa malpuas recipe for durga puja 2024 recipe
नवरात्रीच्या नैवैद्याला २ वाटी गव्हाच्या पिठापासून बनवा परफेक्ट मऊ लुसलुशीत “मालपुवा”; नोट करा गुगलवर ट्रेंड होणारी सोपी रेसिपी

हेही वाचा… किचनतोड साफसफाई! दिवाळीआधी महिलेबरोबर घडलं असं काही की…, VIDEO पाहून बसेल धक्का

दिवाळी तोंडावर आलीय. अजूनही तुम्ही आकाशकंदील (Akash kandil making at home) घेतला नसेल आणि म्हणून तुम्हीदेखील नाइलाजाने महागडा आकाशकंदील घ्यायचा विचार करीत असाल, तर थांबा. घरच्या घरी जास्त खर्च न करता बजेटमध्ये अगदी काही वेळातच तुम्ही हवा तसा मोहक आकाशकंदील बनवू शकता. विशेष म्हणजे हा कंदील तुम्ही पुढच्या वर्षीही वापरू शकाल इतका तो छान टिकतो आणि तसाही आपल्या स्वत:च्या हातांनी बनवलेला फराळ असो किंवा काढलेली रांगोळी असो; ती छानच होते. त्याचप्रमाणे घरच्या घरी कंदील बनविण्याची मजा काही औरच असते. म्हणूनच तुम्हीही घरच्या घरी अगदी काही मिनिटांतच असा आकर्षक कंदील बनवू शकता.

आज आम्ही घरच्या घरी आकाशकंदील (kandil making at home for diwali) कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीत सांगणार आहोत.

दिवाळी कंदील बनवण्यासाठी लागणारं साहित्य (Kandil-making materials)

  1. कार्डशीट पेपर
  2. पेपर ग्लू/ हॉट ग्लू गन
  3. ग्लिटर पेपर
  4. ग्लिटर टेप

दिवाळी कंदील बनवायची कृती

१. 7cm x 7cm च्या कागद घ्या त्याच्यावर 5cm x 5cm आकाराचा कागद चिकटवा.

२. त्यानंतर त्याची दोन्ही टोके फोल्ड करून घ्या आणि गम लावून येथे दाखवल्याप्रमाणे चिकटवून घ्या.

३. त्यानंतर त्याच्या मधोमध चौकोनी आकाराचा ग्लिटर पेपर चिटकवा.

४. येथे दाखवल्याप्रमाणे एका कागदाच्या मधोमध हे फोल्ड केलेले तुकडे चिकटवा आणि त्या कागदाच्या वर आणि खाली डेकोरेटिव्ह सेलोटेप लावून घ्या.

५. आता याची दोन्ही टोके गम लावून चिटकवून घ्या.

६. त्यानंतर एक A4 साईझचा पेपर घ्या. त्यावर उभ्या समातंर रेषा मारून त्या कापून घ्या. याचे दोन्ही टोक गोल आकारात चिटकवून घ्या.

७. आता A4 साईझने बनवलेल्या कंदीलाचा खालचा भाग वरच्या भागाशी जोडून घ्या.