Kitchen tips : स्वयंपाकघरात काम करताना सर्वात मोठी समस्या म्हणजे कुकरची शिट्टी. अनेकदा कुकरची शिट्टी न झाल्यास अन्न करपते. डाळ शिजवतानाही कुकरच्या शिट्टीमधून पाणी वाहू लागते. या सर्व समस्यांमुळे महिलांना दररोज वैतागतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला येथे काही सोप्या टिप्स देण्यात येणार आहेत, ज्यामुळे तुम्हाला कुकरच्या शिट्टीशी संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुकर साफ करण्याचा सोपा जुगाड

१.कुकरची शिट्टी नीट व्हावी यासाठी कुकरचे झाकण व्यवस्थित साफ करणे आवश्यक आहे. त्यात अन्न अडकले तर शिट्टी नीट होत नाही.

२. जेव्हा तुम्ही कुकर स्वच्छ कराल तेव्हा ब्रशच्या मदतीने शिटी व्यवस्थित स्वच्छ करा. याने कुकर व्यवस्थित शिट्ट्या होतील. काही वेळा प्रेशरमुळे कुकरचा स्फोटही होऊ शकतो..

३. शिट्टी गरम पाण्यात भिजवून ब्रशच्या मदतीने नीट स्वच्छ करा. मग बघा कुकरची शिट्टी लवकर कशी वाजते.

४. डाळ शिजवताना कुकरच्या शिट्टीच्या भोवती टिश्यू पेपर ठेवा. डाळीचे पिवळे डाग झाकणावर पडणार नाहीत आणि पाणी देखील शोषले जाईल.

५. याशिवाय झाकणाचे रबर हे देखील कारण शिट्टी नीट न होण्याचे कारण असू शकते. जर रबर सैल असेल तर वाफ अडकून राहू शकत नाही. त्यामुळे कुकरची शिट्टी होत नाही. म्हणून जेव्हा रबर समोरून सैल होईल तेव्हा ते बदला.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Easy kitchen hacks if lentils start flowing from the cooker how to clean cookers whistle snk