कोणताही ऋतू आला की त्यामध्ये काय कपडे घालायचे हा फॅशन प्रेमींसाठी महत्त्वाचा प्रश्न असतो. हिवाळा हाही फॅशनेबल राहण्यासाठी एक उत्तम ऋतू आहे. कारण हिवाळा आपल्याला लेयर्ड कपडे, जॅकेट्स, ट्रेन्च कोट, स्कार्फ्स असे अनेक कपडे घालण्याची संधी देते. हिवाळ्यातील विविध ट्रेंड लोकप्रिय आहेत, परंतु आपली आवड, बॉडी शेप आणि आपल्या शहरातील हवामानाच्या परिस्थितीनुसार योग्य कपडे निवडण्याची गरज असते. बिर्ला सेल्यूलोजच्या डिझाईन प्रमुख असलेल्या नेल्सन जाफरी यांनी असेच हिवाळ्यातील फॅशनचे काही ट्रेंड सांगितले आहेत.
हिवाळ्यात लेयरिंग स्टोल आणि फ्लो व्हिस्कोस जॅकेट परिधान केल्यास लोकांच्या नजरा तुमच्याकडे वळू शकतात. जेव्हा लेयरींग निवडण्याचा प्रश्न येतो तेव्हा फॅब्रिक आणि त्याच्या टेक्सचर लक्षात घेणे महत्वाचे असते. हिवाळा आपल्याला काय घालायचे यासाठी उत्साहित करतो; वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांसह स्वत:ला स्टाईलिश ठेवण्याचे काही मार्ग पुढील प्रमाणे…
स्टोल / स्कार्फ / शॉल: आपल्या गळ्याभोवती आपला स्टोल किंवा शॉल साध्या लूकसाठी एकदा आणि पूर्ण लुक साठी दोनदा गुंडाळा. तुम्ही स्टोल आपल्या खांद्यावर देखील ठेवू शकता आणि आपल्या कमरेला बेल्ट लावू शकता जेणेकरून आरामात काही गोष्टी आऊटफिट्सवर जोडता येईल. मानेच्या ऍक्सेसरीच्या फॅब्रिकची निवड करतानाच नेहमीच योग्य निर्णय घ्यावा. हे नेहमीच व्हिस्कोस आणि सॅटिन सारखे फ्लुएड असले पाहिजे. यातही पुरेसे उबदार असलेले फॅब्रिक निवडले पाहिजे.
जॅकेट्स: जॅकेट आणि कोट शिवाय एखाद्याचा हिवाळा जाणे शक्य नाही. तुमचा पोशाख आणि कार्यक्रमावर आधारित योग्य जॅकेट ठरविणे थोडेसे कठिण असू शकते, परंतु येथे काही दिलेल्या टिप्सचा आधार घेऊ शकता. रात्रीचे बाहेर पडल्यावर आपल्या शरीराच्या आकारानुसार आऊटफिट्सवर जॅकेट परिधान करा. दिवसामध्ये स्टाईल करताना आपल्या आऊटफिट्ससह कोट परिधान करा, आपल्या खांद्यावर भोवती एक स्टोल घ्या आणि कमरेला बेल्ट असू द्या. यामुळे आपल्याला आकार आणि वक्राकार स्टाईल मिळेल ज्यामुळे तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसाल.
श्रग: मुंबई किंवा चेन्नईसारख्या तुलनेने हिवाळ्यामध्ये कमी थंड असलेल्या ठिकाणी, जॅकेट ऐवजी श्रगची निवड करू शकता. सध्या बाजारात वेगवेगळी श्रग सहज उपलब्ध होतात. यातही बरेच पॅटर्न सध्या पाहायला मिळतात.
स्वेटर: हिवाळ्यासाठी आणखी एक मुख्य पोशाख आहे. लेयरिंगसाठी, पातळ, फ्लुएड स्वेटर घेण्याचा सल्ला दिला जातो जो आपल्या शरीराला बोचणार नाही. स्वेटर आपल्या शरीराच्या आकारानुसार परिधान करणे आवश्यक आहे.