अनेक घरात इलेक्ट्रिक स्विच बोर्ड साफ करण्याकडे लक्ष देत नाहीत. कित्येक वर्षे हे स्विच बोर्ड स्वच्छ न केल्यास ते अतिशय घाणेरडे दिसतात. अनेकांना स्विच बोर्ड साफ करताना करंट लागण्याची भीती वाटत असते. म्हणून लोक स्विच बोर्ड स्वच्छ करण्याकडे इतके बारकाईने लक्ष देत नाही, म्हणून आज आम्ही तुम्हाला अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत. ज्याच्या मदतीने तुम्ही स्विच बोर्डवरील काळे डाग अवघ्या काही मिनिटांत साफ करु शकता, जाणून घेऊया…
इलेक्ट्रिक स्विच बोर्ड स्वच्छ करण्याच्या सोप्या ट्रिक्स
१) स्वीच बोर्ड थिनरने करा स्वच्छ
जर तुमच्याकडे नेल पेंड रिमूव्ह करण्याचे थिनर लिक्विड असेल, तर तुम्ही कोणतीही अधिकची मेहनत न घेता काही मिनिटांत स्विच बोर्ड चमकवू शकता. यासाठी स्वीच बोर्डवर थिनर लावा आणि १ ते २ मिनिटे राहू द्या. यानंतर ते कापूस किंवा कापडाने घासून स्वच्छ करा.
२) टूथपेस्टचा करा वापर
तुम्ही टूथपेस्टचा वापर करुनही स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. यासाठी स्विच बोर्डवर टूथपेस्ट नीट लावा आणि कापसाने घासून घ्या. त्यानंतर २ मिनिटे असे ठेवा आणि नंतर ओल्या कापडाने पुसून टाका.
३) बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस
काळा झालेला स्विच बोर्ड चमकवण्यासाठी एका भांड्यात बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस मिसळून एक जाड पेस्ट तयार करा, यानंतर ब्रशच्या मदतीने ती पेस्ट बोर्डवर लावा आणि काही मिनिटे तशीच ठेवा. त्यानंतर स्विच बोर्ड सुती कापडाने घासून स्वच्छ करा.
४) स्विच बोर्ड साफ करताना ‘या’ गोष्टींचा घ्या काळजी
१) स्विच बोर्ड साफ करण्यासाठी स्प्रेचा वापर करु नका.
२) घरातील मेन इलेक्ट्रिक बोर्ड बंद केल्यानंतरच स्विच बोर्ड स्वच्छ करायला घ्या.
३) स्वीच बोर्ड साफ करताना MCB बंद करा
४) साफसफाई करताना लाकडी फळीवर उभे राहा किंवा पायात प्लास्टिकची चप्पल घाला.