Tips To Clean Gas Burner-Stove Top: स्वयंपाकघराची सफाई सर्वात महत्त्वाची असते. बाकी सर्व सफाई तर सहज होऊ जाते पण गॅस शेगडीची सफाई करणे फार अवघड काम आहे. स्वयंपाक करताना कित्येकवेळा दूध, भाजी, पीठ तेल इत्यादी गोष्टी सांडतात ज्यामुळे गॅस स्टोव्ह आणि बर्नर खराब होतो. त्यामुळे कमीत कमी आठवड्यातून एक दिवस याची व्यवस्थित सफाई करणे आवश्यक असते. येथे आम्ही तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने गॅस बर्नर आणि गॅस स्टोव्ह कसे साफ करू शकता हे सांगणार आहोत.
गॅस बर्नर आणि स्टोव्ह साफ करण्याची सोपी पध्दत
- सर्वात आधी गॅस बर्नर काढा आणि मोठ्या पातेल्यात पाणी घेऊन भिजत ठेवा. यामध्ये उकळलेले पाणी टाका. त्याच बर्नर व्यवस्थित बुडलेला असेल याची काळजी घ्या.
- आता बर्नर असलेल्या भांड्यात एक इनो पॅकेट टाका. असे केल्याने बर्नरची छिद्रांमधील घाण आपोआप साफ होईल.
हेही वाचा – आता उन्हाळ्यात रोज वापरू शकता White Dress! पांढऱ्या कपड्यांवरील घामाचे डाग कसे काढावे? जाणून घ्या सोपे Hacks - आता स्टोव्ह टॉपवर बर्नरच्या आसपासची जागेवर गरम पाणी टाकून २ मिनिटं भिजवण्यासाठी सोडा. आता तुम्हाला तुमचे डीआयव्हाय सॉल्यूशन तयार करायचे आहे.
- डीआयव्हाय सॉल्यूशन तयार करण्यासाठी एक लिंबू कापून हातात पकडा. आता पांढरा रंगाची टुथपेस्ट चांगल्या पद्धतीने लिंबूवर लावा आणि तुम्ही पेस्टवर इनो टाका.
- आता शेगडीवर अस्वच्छ जागीवर हे सॉल्यूशन लावा. ही जागा लिंबूने चांगली घासून घ्या. तुम्हाला दिसेल की काही वेळाने साफ होईल आणि चमकू लागेल.
- अशा प्रकारे तुम्ही हे सॉल्यूशन काही वेळ स्टोव्हच्या टॉपवर लावू शकता. जर तुमचा स्टोव्ह स्टीलचा आहे तर तुम्हाला या स्टीलसाठी स्कॉचने देखील घासू शकता. जर शेगडीचा टॉप काचेचा आहे असेल तर जिथे स्टील आहे त्याच भागात हे सॉल्यूशन वापरा.
हेही वाचा – नाश्त्यामध्ये आंबा खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या कसे करू शकता सेवन… - आता तुम्ही टुथ ब्रशच्या मदतीने कोपऱ्यातील भाग घासून तेथील अस्वच्छता साफ करा. असे केल्याने सर्व घाण निघून जाईल.
- आता टिश्यू पेपरच्या मदतीने स्टोव्ह पुसून घ्या आणि सुकवा आणि ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घ्या.
- आता पाण्यामध्ये बर्नर ठेवा आणि एक एक करून काढा आणि ब्रशच्या मदतीने हे साफ करा. अशा प्रकारे चमकू लागेल. आता तुम्ही वाहत्या पाण्याखाली धुवा आणि पुसा. बर्नर आणि स्टोव्ह दोन्ही चमकू लागेल.
- अशा प्रकारे खूप सोप्या पद्धतीने बर्नर आणि गॅस स्टोव्ह साफ होईल. सफाईदरम्यान या गोष्टीची काळजी घ्या की बर्नरच्या छिद्रांमध्ये काही जाऊ नये आणि हे छिद्र बंद झाल्यास समस्या निर्माण होऊ शकते.