आपले शरीर सुडौल असावे, असे प्रत्येकालाच वाटते. हीच इच्छा तुमचीही असेल. बदलत्या जीवनशैलीने लोकांना लठ्ठपणा जणू भेटस्वरुपात मिळाला आहे. छोट्या-छोट्या सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही तुमचे शरीर पिळदार बनवू शकता. त्यासाठी करा हे पुढील उपाय-
* दिवसाची सुरुवात पौष्टिक आणि भरपूर न्याहरीने करा. न्याहरी केल्यास तुमचा चयापचय दर उत्तम राहतो आणि तुमची ऊर्जा पातळीही नियंत्रित राहते.
* परिणामकारकरीत्या वजन कमी करण्यासाठी डबल टोन्ड फुल क्रीम दूध किंवा स्किम्ड दूध घेण्यास सुरुवात करा.
* दिवसातून दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.
* वजन कमी करण्यासाठी कॅलरी असलेल्या शीतपेयांचे सेवन करू नये. जर शीतपेय प्यायचेच असेल तर कमी उष्मांक असलेली किंवा डायट शीतपेये घ्यावीत.
* दिवसभरातील जेवणाची चार भागांत विभागणी करावी. तुमच्या जेवणाच्या अर्ध्या भागात भाज्या, एक चतुर्थांश भागात स्टार्चयुक्त जेवण आणि उर्वरित एक चतुर्थांश भागात मटन (मांसाहारी असाल तर) असले पाहिजे. जर शाकाहारी असाल तर भाज्यांचे प्रमाण वाढवावे.
* लोकांना अनेकवेळा भूक लागल्यासारखे वाटते, परंतु वास्तविक त्यांना तहान लागलेली असते. त्यामुळे तुम्हाला जेव्हा भूक लागेल तेव्हा सर्वात आधी एक ग्लास पाणी प्यावे. यामुळे तुमचे पोट भरल्यासारखे वाटेल.
* नेहमी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ऊर्जा पातळी मंदावते. या वेळी स्नॅक्स खावेत. तसेच कमी मेद असलेले दही किंवा थोडेसे बदाम किंवा आक्रोडचे सेवन करता येईल.
* शक्य तेवढे सूप प्यावे. क्रीम नसलेले, कमी उष्मांक असलेले आणि उच्च तंतुमय पदार्थ असलेलेच सूप प्यावे.
* अन्न हळूहळू आणि चांगल्या रीतीने चावून खावे. पोट भरले आहे, हे समजण्यासाठी मेंदूला १५ मिनिटे लागतात. घाईघाईत जेवण केल्यास जास्त जेवण जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा