Easy ways to the check ghee is pure or not: तुप आरोग्यासाठी पौष्टीक असल्यानं अनेकांच्या रोजच्या आहारात त्याचा समावेश असतो. आपण सगळेच रोजच्या जेवणामध्ये तुपाचा वापर करतो. वरण – भात, पोळी, खिचडी यांसारख्या गरमागरम पदार्थांवर आपण तूप घालून खातो. तूप हे रोजच्या रोज स्वयंपाक करण्यासाठी लागते म्हणून ते मोठ्या प्रमाणांत पुरवठ्याला येईल असे साठवले जाते. तूप हे आपण काहीवेळा घरीच बनवतो तर काहीवेळा ते बाहेरुन विकत आणतो. बाहेरून विकत आणलेल्या तूपामध्ये अनेकदा भेसळ असते. मात्र आपल्याला भेसळयुक्त तूप आणि शुद्ध तुपातला फरक अनेकदा कळत नाही. त्यामुळे आज आपण तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे कसं ओळखायचं जाणून घेऊयात. काही खास ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही शुद्ध तूप आणि भेसळयुक्त तूप कोणते, हे सहज ओळखू शकाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शुद्ध तूप ओळखण्यासाठी कोणत्या टीप्स वापरायच्या हे दिलं आहे.

Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Pune Video
पुणेकराने बनवली फॅन्सी ऑटोरिक्षा; तुम्ही कधी या रॉयल ऑटोरिक्षामध्ये प्रवास केला का? VIDEO एकदा पाहाच
a young girl dance on a electric pole
जीवापेक्षा रील महत्त्वाची का? विजेच्या खांबावर चढून तरुणीने केला डान्स; Video होतोय व्हायरल
Woman describes Her sad Marriage Journey Through Unique Mehendi Design
लग्नापासून ते घटस्फोटापर्यंत; महिलेनी मेहेंदीमध्ये सांगितला दु:खद प्रवास, Video होतोय व्हायरल
Mumbai railway platform Thief got caught stealing wallet inside shocking video goes viral
मुंबईकरांनो चोरी करण्याची ‘ही’ पद्धत पाहा आणि सावध व्हा; रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या मागे उभे राहतात अन्…VIDEO एकादा पाहाच
Raigad Hindi speaking Bhajiwali Controversy shocking video goes viral after kalyan case
“मैं मराठी नही बोलूंगी…तुम हिंदी बोलो” यूपीच्या भाजीवालीची रायगडमध्ये अरेरावी; VIDEO पाहून तुम्हालाही येईल संताप
Lokstta lokrang Journalism Law Director Documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले:  कॅमेरा अँगल आणि जंपकट्स पलीकडले…

पाण्याचा वापर करा

तूप शुद्ध आहे का हे ओळखण्यासाठी तुम्ही पाण्याचा वापर करू शकता. एक ग्लास पाणी घ्या त्यात एक चमचा तूप टाका. जर तूप पाण्याच्या वर तरंगत असेल तर समजायचे की तूप शुद्ध आहे पण पाण्याच्या तळाशी साचून राहिले तर समजायचे तूप भेसळयुक्त आहे.

आयोडिन टेस्ट

आयोडिनने तुपाची शूद्धता तपासण्यासाठी आधी एका वाटीत तूप घ्या. त्यामध्ये आयोडिनचे काही ड्रॉप मिक्स करा. मिक्स केलेलं मिश्रण एकूण २० मिनिटांसाठी तसंच ठेवा. त्यानंतर जर तुपाला लाल किंवा निळा रंग आला तर हे तूप अशुद्ध आहे. तसेच जर रंग बदलला नाही तर तूप शुद्ध आहे.

हातावर घासा

तूप शुद्ध आहे की भेसळयुक्त हे जाणून घ्यायचे असेल तुम्ही हातावर तूप घासून हे ओळखू शकता. यासाठी हातावर तूप घासा जर हे तूप हातावर घासल्यानंतर लगेच विरघळत असेल तर समजायचे की हे तूप शुद्ध आहे पण विरघळण्यासाठी वेळ लागत असेल तर समजायचे की या तूपात भेसळ आहे.

तूप उकळून तपासा

तूप शुद्ध आहे की नाही हे तपासण्यासाठी एका लहान भांड्यात तुम्ही वापरत असलेलं तूप घ्या. त्याला एक उकळी काढून घ्या. त्यानंतर नॉर्मल टेंपरेचरवर हे तूप एका काचेच्या बॉटलमध्ये भरून घ्या. ही बॉटल फ्रिजमध्ये ठेवून द्या. तूप पुन्हा घट्ट झाल्यावर यात जर भेसळ असेल तर दोन वेगळे लेअर दिसतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बाजारातून केळी घरी आणल्यानंतर करा फक्त ‘हे’ सहा सोपे उपाय; १० दिवस राहतील ती एकदम फ्रेश, पडणार नाहीत काळी

भेसळयुक्त तूप कशापासून बनतं?

वनस्पती तूप आणि तिळाच्या तेलाचा मोठ्या प्रमाणात वापर करत हे भेसळयुक्त तूप बनवलं जातं. यामुळे अशुद्धाला चिकटपणा येतो. या तूपालाही शुद्ध तुपासारखाच वास असतो. चवही अगदी तशीच असते. हे बनावट तूप शुद्ध तूपाच्याच किमतीला विकलं जातं. पण असं बनावट तूप खाल्ल्यास त्याचा शरिरावर परिणाम होतो.

Story img Loader