फळे म्हणजे नैसर्गिक जीवनसत्त्व आणि खनिजे यांचा पुरेपूर साठा असतात. रोज प्रत्येकाने कमीत कमी एका तरी फळाचा आहारात समावेश करायलाच हवा. सालासकट फळ खाण्याने त्यातील तंतूंचा फायदा होतो. फळे शक्यतो सकाळी खावीत. दोन खाण्यांच्या मध्ये भूक लागल्यासही फळे खाण्यास हरकत नाही. खूप भूक लागते, तेव्हा इतर पदार्थांच्या ऐवजी दोन फळे खाल्ली तर ती अतिशय उत्तम ठरतात.
काहींना संपूर्ण फळ खाण्यास आवडत नाही. त्यामुळे ते फळांच्या रसाचा पर्याच निवडतात. पण, असे करण्यामध्ये फळातील बिया, साल काढून टाकली जाते. त्यामुळे यातील महत्वाचे घटक निघून जातात. त्यामुळे शक्यतो फळांचा रस घेणे टाळून ते संपूर्ण खाण्यावर भर द्या.
फळे चिरल्याबरोबर शक्यतो लगेच खावीत म्हणजे सगळी जीवनसत्त्व आहारातून मिळतात. काही जण फळांवर लिंबू, काळी मिरी पावडर भुरभुरतात. तशी फळंही खाण्यासही काहीच हरकत नाही. नैसर्गिक साखर फळांत असल्यामुळे मीठ, मसाला, साखर घालून फळे खाणे टाळाव्. बऱ्याच फळांत सोडिअम, पोटॅशिअमही असतंच. त्यामुळे वरून मीठ घालून फळे खाण्याची आवश्यकता नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा