वाढते वजन ही जगातील सर्वात मोठी समस्या आहे. प्रत्येक घरातून एक तरी व्यक्ती या समस्येने त्रस्त असते. वाढत्या वजनामुळे त्रासलेले लोक वर्कआउट करतात आणि आहारावर नियंत्रण ठेवतात, त्यानंतरही त्यांना हवे तसे शरीर मिळत नाही. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बहुतेक लोक घरगुती उपायांवर विश्वास ठेवतात. अनेकदा लोक वजन नियंत्रित करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला देतात. रिकाम्या पोटी लसूण खाणे हे वजन कमी करण्याच्या सर्वात जुन्या टिप्सपैकी एक आहे, जे लोक वर्षानुवर्षे देत आहेत. रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते हे नाकारता येत नाही. कच्चा लसूण एक उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारा आहे जो नसांना आराम देतो आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतो.

जीवनशैलीत बदल केला, आहारावर नियंत्रण ठेवले आणि कच्च्या लसणाच्या पाकळ्यांचे सेवन केले तर वजन झपाट्याने कमी करता येते. लसणात अनेक पोषक घटक असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच शरीरातील ऊर्जा वाढवण्याचे काम करते. त्यात मेटाबॉलिज्म वाढवणारे आणि वजन नियंत्रित करणारे पोषक घटक असतात. वजन कमी करण्यासाठी लसूण किती गुणकारी आहे ते जाणून घेऊया.

curd in any food be dangerous
कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
Six hundred gram babys struggle to survive is finally successful
सहाशे ग्रॅम वजनाच्या बाळाचा जगण्याचा संघर्ष अखेर यशस्वी!
Stop Reheating Your Tea! Expert Shares 3 Ways It Could Be Harming Your Health
चहाप्रेमींनो, थंड चहा पुन्हा गरम करून पिता? मग आताच थांबा, अन्यथा होतील ‘हे’ गंभीर परिणाम
Vidhan Sabha Election 2019 Navneet Rana,
अमरावती जिल्‍ह्यात सूडाच्या राजकारणाचा दुसरा अंक!
mayonnaise food poisoning banned
‘या’ राज्याने मेयोनीजवर बंदी का घातली? मेयोनीज शरीरासाठी खरंच घातक आहे का?

( हे ही वाचा: दुधाचा चहा पिणे शरीरासाठी किती चांगले आणि किती वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

लसूण वजन कमी करण्यास कशी मदत करते?

सकाळी रिकाम्या पोटी लसणाच्या काही पाकळ्या खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते, कारण त्यामुळे शरीरात साठलेली चरबी वितळते. लसणातील बूस्टिंग लेव्हल कॅलरी बर्न करण्यास मदत करते. याचे सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्ही वारंवार खाणे टाळता.

जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार लसूण चरबी जाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यात डिटॉक्सिफाईंग गुणधर्म आहेत जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात.

( हे ही वाचा: Healthy Food: तुम्हालाही दीर्घायुष्य जगायचे आहे? तर आहारात ‘या’ आरोग्यदायी पदार्थांचा नक्की समावेश करा)

वजन कमी करण्यासाठी लसूण कसे खावे?

वजन कमी करण्यासाठी, दररोज रिकाम्या पोटी लसणाच्या २ पाकळ्या खा. बद्धकोष्ठतेची समस्या असल्यास लसणाचे सेवन करू नका. गरोदर स्त्रिया, लहान मुले, कमी रक्तदाब, रक्तस्त्रावाचे विकार आणि मधुमेहाचे रुग्ण यांनी या घरगुती उपायाचा अवलंब करू नये.

‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

  • लसूण जास्त खाणे टाळा कारण त्यामुळे पोटात जळजळ होऊ शकते. २ पेक्षा जास्त लसणाच्या पाकळीचे सेवन करू नका.
  • गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग असलेल्यांनी लसूण खाणे टाळावे.
  • लसणात असलेले काही संयुगे छाती आणि पोटात जळजळ करतात, त्यामुळे लसूण कमी खावीत.
  • लसणामुळे काही लोकांमध्ये ऍलर्जी होऊ शकते आणि त्याच्या लक्षणांमुळे अंगावर उठणार्या पित्ताच्या गाठी, ओठ किंवा जिभेला मुंग्या येणे होऊ शकते. यामुळे नाकात खाज येऊ शकते. शिंका येणे आणि डोळ्यांना खाज येऊ शकते. त्यामुळे अशी एलर्जी दिसल्यास त्वरित लसूण खाणे टाळा.