आयुर्वेदात कडुलिंब अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कडुलिंब चवीला कडू असला तरी त्याच्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, जे आरोग्यासाठी चांगले असतात. शिवाय कडुलिंब कुठेही आणि सहज उपलब्ध होणारी वनस्पती आहे. आयुर्वेदानुसार सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाल्ल्यास शरीरातील निम्मे आजार बरे होऊ शकतात. तर रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे काय फायदे आहेत याबाबतची माहिती आपण जाणून घेऊया.
रिकाम्या पोटी कडुलिंब खाण्याचे फायदे –
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करते
खराब जीवनशैलीमुळे भारतात दिवसेंदिवस मधुमेहाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शिवाय आजही अनेक लोक घरगुती उपचारांवर विश्वास ठेवतात. यापैकी एक घरगुती उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाची पाने खाणे. या पानांचे सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
रक्त शुद्ध ठेवणे
कडुलिंबात असे काही औषधी गुणधर्म आहेत, जे शरीरातील रक्त शुद्ध करण्यास मदत करतात. ते रक्तातील विष बाहेर काढून रक्त डिटॉक्स करतात. तसेच जर तुमचे रक्त स्वच्छ असेल तर तुम्हाला कोणताही आजार होऊ शकते नाही.
हेही वाचा – महिनाभर कॉफी सोडल्यास त्याचे शरीरावर काय परिणाम होतील? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात
पोटासाठी फायदेशीर
कडुलिंब केवळ आपल्या त्वचेसाठीच नाही तर पोटासाठीही खूप फायदेशीर मानला जातो. यामध्ये असलेले गुणधर्म अॅसिडिटीमध्ये खूप उपयुक्त आहेत आणि कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने आम्लपित्त आणि पोटदुखीपासून आराम मिळू शकतो.
रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर
कडुनिंबाच्या पानांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट असतात, जे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. एवढेच नाही तर सर्दी, खोकला यांसारखे आजार बरे करण्यासाठी याचा उपयोग होतो.
अशी वापरा कडुनिंबाची पाने
साधारणपणे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट बनवून त्यातून काढलेला रस पिला जातो. कडुलिंबाच्या ताज्या पानांचा रस नेहमी सेवन करा. तुम्हाला हवे असल्यास कडुनिंबाची पाने तव्यावर कोरडी भाजून हाताने मॅश करून त्यात लसूण आणि मोहरीचे तेल घालून भातासोबत खाऊ शकता.
कडुलिंबाच्या पानांचे सेवन करताना ही खबरदारी घ्या
एकावेळी खूप कडुलिंबाची पाने खाऊ नका. कडुलिंबाची पाने जितकी जास्त खावीत तितके चांगले पोषण मिळेल असे अनेकांना वाटते. मात्र, या पानांचे केवळ गरजेपुरते आणि प्रमाणात सेवन करा.
(टीप – वरील माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्हाला कोणताही आजार असल्यास, कडुलिंबाची पाने सेवन करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. ).