Ghee on Empty Stomach Benefits: टोमॅटो, आल्याचा दर वाढल्यापासून अनेकजण यांचे आहारातील सेवन कमी करण्याचे मार्ग शोधत आहेत. पण कितीही महागाई वाढली तरी प्रत्येक घरात लहानसा का होईना तुपाचा डबा असतो. अगदी रोजच्या रोज एक चमचा तूप लावलेल्या पोळ्या खाल्ल्याने सुद्धा तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. असं म्हणतात कुठलाही पदार्थ वेळ-काळ बागहून खाल्ल्यास त्याचे फायदे अधिक प्रमाणात मिळू शकतात, अनेक आहारतज्ज्ञांच्या माहितीनुसार, तूप खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी, तुम्ही झोपेतून उठल्यावर अनसे पोटी (काहीही न खाता) जर तुपाचे सेवन केले तर त्याचे असंख्य फायदे मिळू शकतात. यातीलच काही फायद्यांची यादी खालीलप्रमाणे:

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करण्याचे फायदे

  • तुपाचे सेवन केल्यास आतड्याची शोषण क्षमता सुधारते आणि शरीरातील आम्ल कमी होते.
  • सकाळी रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत राहते.
  • शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडल्याने केस व त्वचेला चमक मिळते.
  • बद्धकोष्ठता आणि मूळव्याध यासारख्या शौचाशी संबंधित समस्या दूर होण्यास सुद्धा मदत होते.
  • तुपाचे सेवन केल्याने भूक शांत होते आणि वजन नियंत्रणात राहते.
  • तुपात आतड्यांसंबंधी अनुकूल एन्झाईम असतात, जे आतड्यांसंबंधी आरोग्य सुधारण्यास मदत करतात.
  • तुपाचे सेवन केल्याने हाडे मजबूत होतात. लहान मुलांना तूप खाऊ घालणे खूप फायदेशीर आहे.
  • तुपातील ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे शरीरातील घातक फॅट्स बाहेर पडून वजन कमी होण्यास मदत होते.
  • तुपामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहात असल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
  • तुपामुळे शरीर उबदार राहण्यास मदत होते व परिणामी सर्दी- खोकल्यावर मात करता येते.

हेही वाचा- केळी खरेदी करताना ‘या’ चुका तुम्हीही करता का? जाणून घ्या ‘या’ खास टिप्स ….

रिकाम्या पोटी तुपाचे सेवन कसे करावे?

तुपाचे सेवन शरीराला फायदेशीर असले तरी प्रमाणाच्या बाहेर खाणे नुकसानदायक ठरू शकते. एक टीस्पून तूप हे सकाळी खाता येऊ शकते. यामध्ये काहीजण काळी मिरी पूड टाकूनही सेवन करतात यामुळे आम्ल पित्ताच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होऊ शकते. याशिवाय कोमट पाण्यात एक चमचा तूप घालून प्यायल्यास सुद्धा पचनास मदत होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat one spoon ghee in bed on empty stomach benefits digestion cholesterol control eating in this way gives 10 times better result svs
Show comments