दिवाळीच्या दिवसांत आधीच सुग्रास भोजनावर अधिक ताव मारला जातो. त्यातच गोड पदार्थ व मिठाईमुळे उष्मांकांचे प्रमाण वाढते. त्यामुळे वजन वाढते. तेव्हा, आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आहार आणि विहाराकडे योग्य लक्ष द्या, असा सल्ला आहारतज्ज्ञांनी दिला आहे.  
दिवाळीनिमित्त फराळाचे विविध पदार्थ मिठाई बाजारात उपलब्ध होत असल्याने हे पदार्थ घरी तयार करण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नोकरदार वर्गाकडे रेडीमेट पदार्थ खरेदी करण्याकडे कल असतो. बाजारातील सर्वच पदार्थ खराब किंवा भेसळीचे असतेच असे नाही. परंतु काही प्रमाणात वाढती मागणी लक्षात घेता त्यात भेसळ केली जाते. विशेषत मिठाईमध्ये खव्याचे प्रमाण अधिक दिसून येते. त्यातही खवा शुद्ध असतोच असे नाही. या दिवसांत खव्यामध्ये रवा मिसळला जात असतो. दिवाळीनिमित्त गोड पदार्थ फार दिवसांपूर्वीच तयार केले जातात. आपणाला मात्र ताजे पदार्थ आणल्याचा भास होतो. त्यातच हे पदार्थ घरी नेल्यानंतर बरेच दिवस पडून असतात. त्यामुळे पैसे देऊनही शुद्ध पदार्थ मिळत नसल्याने त्याचा आरोग्यावरच विपरित परिमाण होतो. ही स्थिती लक्षात घेता, शक्यतो दिवाळीसाठी फराळाचे पदार्थ व गोड पदार्थ घरीच तयार करावेत, असा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
या दिवसांत दिवसभर काही ना काही फराळाचे पदार्थ सेवन केले जाते. तर रात्री भोजन केल्यानंतर आपण झोपी जातो. असं करू नका. कारण भोजन पचन्यास बराच वेळ लागतो. त्यामुळे झोपण्याच्या किमान दोन तास आधी जेवण करावे. या दिवसांत पोटाचे विकार बळावतात. तेव्हा लागते तेवढाच व पचेल एवढाच आहार घ्या. अधिक तेल, तूप असलेले भोजन घेऊ नये. गोड पदार्थ खायचे झाल्यास शूगर फ्री मिठाईचा वापर करावा. दिवसा कमी भोजन करावे.
मिठाई खान्याऐवजी श्रीखंड किंवा खीर खावी. मिठाईमध्ये ३४९, जलेबीमध्ये ४६९, १०० ग्रॅम बर्फीमध्ये ४०९ आणि गुलाबजामूनमध्ये ३८७ प्रथिने असतात. तेव्हा हे पदार्थ घेताना आरोग्याची काळजी घ्यावी, असेही आहारतज्ज्ञांचे सांगणे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा