Teeth Whitening Natural Superfoods: एखाद्या व्यक्तीचं गोड हास्य फक्त त्याचा/ तिचा आनंदच नव्हे तर संपूर्ण व्यक्तिमत्व कसे आहे हे दर्शवत असते. अर्थात यासाठी दोन गोष्टी आवश्यक असतात एक म्हणजे आनंद शोधणं आणि दुसरं म्हणजे दातांची स्वच्छता. खळखळून हसण्यासाठी या दोन गोष्टी असल्या तरी पुरे ठरतात म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. गमतीचा भाग वगळल्यास अलीकडे दात पांढरे शुभ्र दिसावेत म्हणून काय करता येईल याविषयी अनेक जण चिंतीत दिसतात. महाग ट्रीटमेंट, टूथपेस्ट, टूथब्रश वापरून सुद्धा काहींना हे लखलखत्या दातांचं ध्येय गाठता येत नाही. हीच समस्या तुमच्या आहारात काही साधे बदल किंबहुना काही गोष्टींचा समावेश करून सोडवता येऊ शकते.

आज आपण, डॉ विश्वास पाटील, बालरोग दंतचिकित्सा विभाग, सूर्या मदर अँड चाइल्ड सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, पुणे, यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीतून दाताच्या आरोग्यसाठीचे काही सुपरफूड्स जाणून घेणार आहोत. नैसर्गिक टूथब्रश म्हणून काम करणार्‍या कुरकुरीत भाज्यांपासून ते हिरड्यांच्या आरोग्यास मदत करणार्‍या पौष्टिक समृध्द फळांपर्यंत, असे सुपरफूड जे तेजस्वी आणि निरोगी हास्यासाठी योगदान देऊ शकतात, त्यांची ही सविस्तर यादी पाहा.

Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?
fruits pack the most nutritional punch
Nutrient Rich Fruits : कोणती फळं सर्वात जास्त पोषण देतात तुम्हाला माहिती आहे का? मग आहारतज्ज्ञांनी दिलेली ‘ही’ यादी वाचा
Lauki ke creamy kofta in Marathi dudhi kofta recipe in marathi veg kofta recipe in marathi
दुधी खाताना घरचे नाक मुरडतात ? बनवा झणझणीत दुधी कोफ्ता; ही रेसिपी बनवाल तर दोन पोळ्या जास्तच खाल
Which metal vessel is used to boil
दूध उकळवण्यासह पिण्यासाठी कोणत्या धातूच्या भांड्याचा वापर केला जातो?

पाणी

पाणी हे सर्वात साधे, सहज सोपे उत्तर तुमचे अनेक प्रश्न सोडवू शकते. साधं पाणी प्यायल्याने तोंड हायड्रेट होतं आणि तोंडातून अन्नाचे सर्व अवशेष देखील बाहेर पडतात. पाण्यामुळे तोंडात लाळ निर्माण होण्यासाठी मदत होते. हायड्रेटेड राहण्यासाठी आणि दातांची झीज टाळून त्यांचे सौंदर्य राखण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने दररोज ३ लिटर पाणी प्यावे.

पालेभाज्या

पालक, केल, यांसारख्या सर्व पालेभाज्या, गाजर, सेलेरी सारख्या भाज्यांमध्ये फॉलिक अॅसिड भरपूर प्रमाणात असते. शिवाय यामध्ये व्हिटॅमिन बी सत्व मुबलक प्रमाणात असते जे हिरड्यांच्या रोगांशी लढण्यास मदत करते.

सफरचंद, स्ट्रॉबेरी, आवळा

सफरचंद हे फायबर आणि पाण्याचे महत्त्वपूर्ण स्त्रोत आहेत जे लाळ उत्पादनास मदत करते. शिवाय, सफरचंदातील नैसर्गिक शर्करा तोंडातील हानिकारक ऍसिड कमी करण्यास मदत करते. डॉ. पाटील यांच्या मते, स्ट्रॉबेरी आणि क्रॅनबेरी हे नैसर्गिक इनॅमल व्हाइटनर्स (दातांची शुभ्रता वाढवणारे घटक) म्हणून काम करतात. या फळांमधील मॅलिक अॅसिडने प्लेक तयार होण्याचे प्रमाण कमी करतात. पेरू आणि आवळा हे व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत आहेत, जे कोलेजन उत्पादनास मदत करतात ज्याची हिरड्या मजबूत आणि निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.

सुकामेवा

बदाम, काजू, पिस्ता आणि अक्रोड यांसारख्या सुक्यामेव्यामध्ये सूक्ष्म सत्व असतात. बदामामध्ये आर्जिनिन नामक एक अमिनो आम्ल असते जे दातांमध्ये कीड व पोकळ्यांचा धोका कमी करण्यास मदत करते. यामुळे लाळेचे प्रमाण वाढून हिरड्यांच्या आजारांना आळा बसतो.

सीफूड

सीफूड, विशेषत: मासे, ओमेगा -3 फॅटी ऍसिडने समृद्ध असतात, जे हिरड्यांची जळजळ कमी करण्यास आणि जखम झाली असल्यास जलद भरून काढण्यास मदत करतात.

ग्रीन टी

पॉलिफेनॉल आणि कॅटेचिन असलेली ग्रीन टी पीरियडॉन्टल रोगांचा धोका कमी करण्यात मोठी भूमिका बजावते. ग्रीन टी फ्लोराईडचा अतिरिक्त स्रोत म्हणून देखील काम करते आणि श्वासाची दुर्गंधी टाळण्यास मदत करते.

चणे व डाळी

चणे, काळी उडीद डाळ, काळे चणे यामध्ये फॉलिक अॅसिड, मॅग्नेशियम, जस्त आणि लोह भरपूर प्रमाणात असते. जे दातांवर संरक्षक मुलामा चढवण्यासाठी मदत करतात व कीड होण्याचे प्रमाण कमी करतात.

दूध आणि चीज

दुग्धजन्य पदार्थ, जसे की दूध आणि चीजमध्ये कॅसिन हे प्रोटीन असते जे दातांवर संरक्षक थर चढवण्याचे काम करतात. शिवाय दुधामध्ये फॉस्फरस देखील असतो. तर चीजमध्ये फॉस्फेट असते, जे तोंडातील पीएच पातळी संतुलित करण्यास मदत करते.

हे ही वाचा<< १२१ किलोच्या इन्फ्लुएन्सर तरुणीने पालटलं रूप; ४० किलो वजन कमी करतानाचा डाएट व ‘चीट डे’ ची हॅक केली शेअर

लक्षात घ्या, दातांच्या स्वच्छतेसाठी सुपरफूड्स ही जादूची गोळी नाही. दिवसातून दोनदा ब्रश करणे, नियमितपणे फ्लॉसिंग करणे आणि तपासणीसाठी तज्ज्ञांकडे जाणे महत्त्वाचे आहे. पण आहारात या पोषक-समृद्ध पर्यायांचा समावेश केल्याने तोंडाचे आरोग्य राखण्यास मदत नक्कीच होऊ शकते.