60-Day Weight Loss Plan: दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही. पौष्टिक आहाराची कमतरता आणि व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहे. अशात पोटावरील चरबी वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. एकदा पोटावरील चरबी वाढली की ती कमी करणे सोपी नसते. पोटावरील घेर वाढल्याने फिटनेस ध्येयामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. फिटनेस ट्रेनर विमल राजपूत हे नेहमी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फिटनेस टिप्स शेअर करत असतात. सध्या त्यांचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाचा प्लॅन सांगितला आहे ज्याद्वारे आपण ६० दिवसात अतिरीक्त वजन कमी करू शकतो.
विमल यांनी इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फ्री जेवणाचा प्लॅन” पुढच्या २ महिन्यांसाठी प्रोटिनयुक्त पदार्थांचे सेवन करण्यासाठी आणि पोटावरील फॅट कमी करण्यासाठी त्यांनी नाश्ता आणि जेवणाच्या दोन्ही वेळचे तीन पर्याय सांगितले आहे. आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊ या –
पाहा व्हिडीओ (Watch Video)
नाश्त्याचे पर्याय (Breakfast option)
पर्याय १:
३-५ अंडी (कॅलरीज टाळण्यासाठी जास्तीत जास्त अंड्याचा पांढरा भाग खा)
¼ ते ½ अॅव्होकॅडो
सँडविचचा छोटा तुकडा
पर्याय २:
२५०-३५० ग्रॅम ग्रीक दही
½ ते 1 स्कूप व्हे प्रोटीन
१० ग्रॅम मध
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि केळी
पर्याय ३:
एग व्हाइट ऑम्लेट
शिमला मिरची
१-२ ब्रेडचे स्लाइस
तुम्हाला आवडणारी कोणतीही भाजी
दुपारच्या जेवणाचे पर्याय (Lunch option)
पर्याय १:
२००-३०० ग्रॅम चिकन ब्रेस्ट
१ कप शिजवलेला भात
भाज्या
पर्याय २:
मासे ( २-३ पिसेस)
मिक्स सॅलड
१००-१५० ग्रॅम रताळे
चेरी टोमॅटो
काकडी
पर्याय ३:
¼ रोस्ट चिकन
सॅलड मिक्स
¼ अॅव्होकॅडो
टोमॅटोचे स्लायसेस
रात्रीच्या जेवणाचे पर्याय (Dinner option)
पर्याय १:
२००-३०० ग्रॅम स्टीक (मांसचा तुकडा)
तीन वेगवेगळ्या भाज्या
पर्याय २:
२००-३०० ग्रॅम चिकन
½ ते १ कप शिजवलेला भात
तीन प्रकारच्या भाज्या
कमी कॅलरीज असलेले सॉस
पर्याय ३:
२००-३०० ग्रॅम चिकन ब्रेस्ट
१ कप शिजवलेला भात
काकडी, ढोबळी मिरची आणि गाजर
१ उकडलेले अंडे