हिवाळ्यात आपल्याला अनेक पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. कधी गरम-गरम पदार्थ, कधी तिखट तर कधी गोड. काही लोकं तर अशी असतात की त्यांना सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असते. मग कोणता सण समारंभ असो वा नसो. या व्यक्ती गोड खाणं सोडत नाही. जर तुम्हाला सुद्धा असंच काही तरी गोड खावंसं वाटत असेल तर तुम्ही आपल्या घरीच बनवलेल्या पदार्थांचे सेवन करू शकता. मुळात, घरी तयार केलेले पदार्थ फक्त चविष्टच नसतात, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूपच चांगले असतात. असे पदार्थ बनवताना शुद्धतेची विशेष काळजी घेतली जाते. आज आपण अशाच आरोग्यदायी पण चविष्ट लाडूंबद्दल जाणून घेऊया जे तयार करण्यासाठी अगदी सोपे असले तरी आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तिळाचे लाडू :

तिळाचे लाडू तर सर्वांनाच आवडतात. महाराष्ट्रात तर या लाडूंना विशेष महत्त्व आहे. मकरसंक्रांतीला हे लाडू आवर्जून बनवले जातात. हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फक्त २ गोष्टी लागतात ते म्हणजे तीळ आणि गूळ. आपण काळ्या किंवा सफेद, दोन्ही तिळाचे लाडू बनवू शकतो. गूळ आणि तीळ या दोन्ही गोष्टी हिवाळ्यात आपल्या शरीराला गरम आणि आरोग्यदायी ठेवण्यास मदत करतात. तिळात असलेले तेल आपल्या शरीराला पूर्णपणे गरम ठेवण्यात आणि शरीराचे तापमान कमी होण्यापासून रोखण्यास मदत करते. याशिवाय तिळात असलेले अनसॅच्युरेटेड फॅट कोलेस्टॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम करते.

सुंठाचे लाडू :

सुंठ आपल्या शरीरासाठी अतिशय गुणकारी आहे. सुंठाचा गुणधर्म गरम असतो. हिवाळ्याच्या दिवसात इम्युनिटी मजबूत करण्यासाठी दररोज सुंठाच्या लाडूचे सेवन करणे फायदेशीर ठरते. सुंठामध्ये अँटी-बॅकटेरिअल गुणधर्म असतात जे इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. महिलांच्या डिलिव्हरीनंतर त्यांना सुद्धा हे लाडू दिले जातात. हे लाडू खाल्ल्याने शरीरास ताकद मिळते.

खजुराचे लाडू :

डायटिंग करणाऱ्यांसाठी खजुराचे लाडू हा एक उत्तम पदार्थ आहे. हे लाडू बनवण्यासाठी भरपूर सुक्यामेव्याची गरज असते. या व्यतिरिक्त यामध्ये तूप आणि साखर यांची अजिबात गरज नाही कारण खजूर हे फार गोड असते. हे लाडू अँटीऑक्सिडेंट्स आणि पोषक तत्वांनी भरपूर असतात.

हे लाडू बनवणं अगदी सोपं तर आहेच पण त्याच बरोबर आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आणि चविष्ट देखील आहेत. तर हे लाडू या हिवाळ्यात नक्की बनवून बघा.