चहा हे भारतीयांचे सर्वात आवडते पेय आहे. बहुतेक चहा पिणारे सर्वजण दिवसाची सुरूवात चहा पिऊनच करतात. मग त्याबरोबर बऱ्याच वेळा बिस्कीट, ब्रेड असे पदार्थ बऱ्याच वेळा खाल्ले जातात. पण तज्ञांच्या मते चहाबरोबर ब्रेड खाल्ल्याने ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यामुळे गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. नियमित चहा आणि ब्रेड खाणाऱ्या व्यक्तींना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. कोणत्या आहेत त्या समस्या जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आणखी वाचा : रात्रीच्या जेवणात ‘या’ पदार्थांचा समावेश चुकूनही करू नका; ठरतील आरोग्यास धोकादायक

चहाबरोबर ब्रेड खाण्याचे परिणाम

  • ब्रेडमध्ये प्रिजरवेटिव्ह मिसळलेले असतात. त्यामुळे नियमित ब्रेड खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. तसेच यामुळे पोटाचे विकार होण्याची शक्यता असते.
  • ब्रेड खाल्ल्याने रक्तातील साखर वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी ब्रेड न खाण्याचा सल्ला दिला जातो.
  • चहा आणि ब्रेड एकत्र खाल्ल्याने हाय बीपीची समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे चहा आणि ब्रेड एकत्र न खाण्याचा सल्ला तज्ञ देतात.
  • ब्रेड आणि चहा एकत्र खाल्ल्याने पोटात अल्सर होऊ शकतो. तसेच याचे जास्त सेवन केल्याने अॅसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो.
  • चहा आणि ब्रेडच्या नियमित सेवनाने हृदयविकाराचा धोकाही वाढू शकतो. ब्रेडमुळे कोलेस्ट्रॉल वाढते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Health Tips : गरम पाणी प्यायल्याने शरीरावर काय परिणाम होतो जाणून घ्या

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)