Eating chana and kishmish: हिवाळ्यात शरीर इतर दिवसांपेक्षा जास्त समस्यांना बळी पडते. या दिवसांत इतर ऋतूंच्या तुलनेत जास्त आरोग्य समस्या उद्भवतात. त्याशिवाय शरीरात ऊर्जेची कमतरता असते. अशा वेळी सकाळचा नाश्ता हा पौष्टिक असणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अशा परिस्थितीत हरभरा आणि मनुके खाणे हा सर्वांत सोपा आणि आरोग्यदायी नाश्ता असू शकतो.
उपाशीपोटी हरभरा आणि मनुक्यांचे सेवन कसे करावे?
रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुके खाण्याची पद्धत अगदी सोपी आहे. त्यासाठी तुम्हाला रोज सकाळी रिकाम्या पोटी मूठभर हरभरे आणि मनुका खावे लागतील आणि नंतर कोमट पाणी प्यावे.
रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुके खाण्याचे फायदे
त्वरित ऊर्जा मिळेल
हरभऱ्यामध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते आणि मनुक्यांमध्ये लोह असते. या दोन्ही पदार्थांच्या मिश्रणामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि दिवसाची सुरुवात चांगली होते. त्यामुळे जेव्हा तुम्ही नाश्ता करीत नाही तेव्हा तुम्ही या दोन्हींचे सेवन करू शकता; ज्यामुळे शरीराची ताकद वाढेल.
त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी
जर तुम्हाला तुमचे केस आणि त्वचा निरोगी ठेवायची असेल, तर तुम्ही सकाळी या दोन्हींचे सेवन करू शकता. हे दोन्ही कोलेजन वाढवण्यास मदत करू शकतात. हरभऱ्यातील प्रथिने त्वचेची लवचिकता वाढवण्यासाठी, तर मनुक्यांमधील लोह केसगळती कमी करते. या आहाराने केसांच्या वाढीस प्रोत्साहन मिळून, केसांच्या अनेक समस्या कमी होतात.
हेही वाचा: वजन कमी करण्यापासून ते त्वचा चमकदार बनवण्यापर्यंत; मुळ्याची पाने आहेत अधिक फायदेशीर
वजन कमी करण्यास उपयुक्त
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रिकाम्या पोटी हरभरा आणि मनुका यांचे सेवन करावे. तुमचे वजन संतुलित करण्यासाठी, हार्मोनल आरोग्य उत्तम राखण्यासाठी हे फायदेशीर आहे.