प्रत्येकालाच आपले शरीर निरोगी ठेवायचे आहे. त्यासाठी पपई खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईत खनिज, पोषक तत्व आणि जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. पपईचे सर्वात जास्त उत्पादन भारतामध्येच होते. पपईत अ, ब, क, ड जीवनसत्त्वे आणि कॅल्शियम, लोक, प्रोटीन आदी तत्त्व विपुल प्रमाणात असतात. पोटांचे विकार दूर करण्यासाठी पपईचे सेवन करणे, लाभकारी असते. या फळाच्या सेवनाने पचनसंस्थेचे कार्य सुधारते. यासोबतच पपई तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी घेते. चला तर जाणून घेऊया, पपई कशाप्रकारे घेते तुमच्या हृदयाची आणि हाडांचीही काळजी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत
आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी डॉक्टर पपई खाण्याचा सल्ला देतात. पपईमध्ये ‘जीवनसत्त्व क’ देखील भरपूर असते. जर ‘जीवनसत्त्व क’ भरपूर असेल तर आपली प्रतिकारशक्ती कधीच कमकुवत होत नाही. म्हणूनच पपईला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे फळ असेही संबोधले जाते.

हृदयविकारांपासून दूर ठेवण्यास मदत
पपई हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते. यामध्ये फायबर, पोटॅशियम, अँटिऑक्सिडंट्ससह अनेक जीवनसत्त्वे असतात. हे पोषक घटक आपले हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामध्ये असलेले उच्च फायबर कोलेस्ट्रॉल देखील नियंत्रित करते. कोलेस्ट्रॉल राखले की, आपण हृदयविकारांपासूनही दूर राहतो. पपईमध्ये ‘जीवनसत्त्व क’, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. यामध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

(आणखी वाचा : Blood Sugar Level Per Age: तुमच्या वयानुसार रक्तातील साखरेचे प्रमाण किती असायला हवे? पाहा ‘हा’ तक्ता )

हाडांना होतो फायदा
पपई केवळ आपल्या हृदयालाच नाही तर हाडांनाही मजबूत ठेवण्यास मदत करते. पपईमध्ये लोहासोबतच कॅल्शियमही कमी प्रमाणात राहते, पण त्यात असलेले फॉस्फरस आपल्या हाडांची काळजी घेते.

डोळ्यांसाठी ठरते फायदेशीर
पपईमध्ये असलेले अ-जीवनसत्त्व आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे. अ-जीवनसत्त्व विशेषत: दृष्टीसाठी फायदेशीर मानले जाते. याशिवाय पपईमध्ये असलेले फायबर आपल्या शरीरात विषारी पदार्थ राहू देत नाही, ज्यामुळे पोटही साफ होते.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating papaya will keep your heart and bones strong
Show comments