दैनंदिन जीवनात जंक फूड खाण्याची क्रेझ प्रचंड वाढली असून बदलत्या जीवनशैलीवरही नकारात्मक परिणाम होताना दिसत आहेत. जर तुम्ही फास्ट फूड खाण्याची आवड असेल, तर तुम्हाल आता सावधान होणं अत्यंत गरजेचं आहे. कारण पिझ्झा, बर्गर बिस्किट्स, कोल्ड ड्रिंक्स आणि विविध प्रकारचे अल्ट्रा प्रॉसेस्ड फूडचं सेवन केल्यामुळं तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबातील इतिहास, वाढते वय आणि खराब जीवनशैलीला जोडला गेलेला हा भयंकर आजार आहे. एखादा व्यक्तीने दिर्घकाळ खराब जीवनशैलीचा अवलंब केल्यास त्याला कर्करोगासारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो, अशी माहिती एका संशोधनाच्या माध्यमातून समोर आली आहे.
अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन केल्यामुळं २९ टक्के पुरुषांना या गंभीर आजाराचा फटका बसल्याचं संशोधनाच्या माध्यमातून समोर आलं आहे. तसंच रेडी टू ईट फूडचं सेवन करण्याचं प्रमाण महिलांमध्येही अधिक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे महिलांनाही कर्करोग होण्याचा धोका १७ टक्क्यांनी वाढला आहे.
….म्हणून प्रोसेस्ड फूडच्या सेवनामुळं कर्करोग होतो
घरगुती स्वयंपाकात आपण ज्या पदार्थांचा वापर करत नाहीत, असे पदार्थ अल्ट्रा प्रोसेस्ड खाद्य पदार्थांमध्ये वापरले जातात. यामध्ये केमिकल, स्वीटनर सारखे पदार्थ आरोग्यासाठी हानीकारक ठरतात. अल्ट्रा प्रोसेस्ड आणि प्रोसेस्ड फूडमध्ये फरक आहे. प्रोसेस्ड फूडमध्ये पदार्थांना गरम करणे, फ्रीज करणे, डायसिंग, ज्यूसिंगचा समावेश असतो. प्रोसेस्ड फूड अल्ट्रा प्रोसेस्ड फूडच्या तुलनेनं आरोग्यास कमी हानिकारक असतो.
कॉमन अल्ट्रा प्रोसेस्ड फूड आयटम
इंस्टेंट नूडल्स आणि सूप
रेडी टू ईट मील्स
पॅक्ड स्नॅक्स
फिजी कोल्ड ड्रिंक्स
केक, बिस्किट, मिठाई
पिझ्झा, पास्ता, बर्गर
अशाप्रकारचे खाद्यपदार्थ स्वस्त आणि सहजरित्या मिळतात. पण या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात. त्यामुळे तु्म्ही अशा पदार्थांचा सेवन जास्त करता. अल्ट्रा प्रोसेस्ड फूड वेस्टर्न लाइफस्टाइलचा एक भाग बनला आहे. आरोग्य तज्ज्ञांनी जवळपास 23000 लोकांमध्ये केलेल्या एका संशोधनानुसार, अनहेल्दी डाएट आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचा सेवन करणाऱ्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण अधिक असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे अल्ट्रा प्रोसेस्ड फूड खाणं टाळावे, असे आवाहन आरोग्य अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.
अल्ट्रा प्रोसेस फूड प्रोडक्ट्समध्ये साखर, मीठ, वसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर असतं. त्यामुळे शरीरासाठी आवश्यक फायबर आणि पोषक तत्वांचं प्रमाण अशा प्रकारच्या फूडमध्ये खूपच कमी असतं. तुम्हाला अशाप्रकारचं फूडचं सेवन करण्यापासून दूर राहायचं असेल, तर तुम्हाला स्ट्रीक्ट डाएट फॉलो करावा लागेल. शरीसाठी आणि निरोगी आरोग्यासाठी आवश्यक असणारे खाद्यपदार्थ खाण्याची सवय तुम्हाला लावाली लागेल.