Eating Sprouts At Night: मोड आलेली कडधान्ये खाणे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगले असते. आपण बहुतेक वेळा सकाळचा नाश्ता किंवा दुपारच्या जेवणात मोड आलेली कडधान्ये खातो. चांगल्या आरोग्यासाठी आपल्या रोजच्या डाएटमध्ये कडधान्यांचा समावेश असावा असे सांगितले जाते. कडधान्ये प्रोटीन्स आणि इतर महत्त्वाच्या पोषक घटकांचा उत्तम स्रोत असल्याने ही कडधान्ये खाल्ली जातात. मोड आलेली कडधान्ये शरीराला पोषण देणारी असतात. वजन कमी करण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, शरीराची झीज भरून काढण्यासाठी मोड आलेली कडधान्ये खाण्याला खूप महत्त्व दिले जाते. नुसत्या कडधान्यांपेक्षा मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी अधिक पौष्टिक मानली जातात. मात्र, यामध्ये वेळ खूप महत्त्वाची आहे, पौष्टिक अन्न खाल्लं तरीही ते कोणत्या वेळी खाता हेसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊयात मोड आलेली कडधान्यं खाण्याची योग्य वेळ काय? रात्रीच्या वेळी जर मोड आलेले कडधान्य खाल्ले तर त्याचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊयात.
मोड आलेल्या कडधान्यांचे आरोग्यदायी फायदे
व्हिटॅमिन बी १२ चे स्रोत
डॉ. सेतारे ताबोडी-विल्कॉफ सांगतात, दिवसातून दोन कप मोड आलेली कडधान्ये खाऊ शकता. जे तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी १२ तयार करण्यास आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. कडधान्य खाण्याचा सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे त्यांना मोड आणून खाणं. कडधान्यांना मोड येतात तेव्हा त्यातील पोषक घटकांची फार मोठ्या प्रमाणात वाढ होते.
पचनक्रिया सुधारते
पचनक्रिया सुधारण्यासाठी आहारात कडधान्यांचे सेवन करावे. यामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते, जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पचनसंस्था निरोगी ठेवण्याचे काम करते. ज्या व्यक्तींना पचनक्रिया किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल अशांनी आहारात मूग किंवा इतर कडधान्य खाल्ली पाहिजे.
रोगप्रतिकारशक्ती वाढते
बदलत्या वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर लगेच दिसून येतो, लगेच दिसून येतो. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवणे आवश्यक आहे . कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात. मोड आलेली कडधान्ये खाल्ल्याने शरीर आजारांपासून दूर राहते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
वाढत्या वजनाच्या समस्येने अनेक जण हैराण झाले आहेत. व्यायामशाळेत जाऊन कितीही व्यायाम केला तरी वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी आहारात योग्य ते पदार्थ खाल्ल्याने वजन कमी होते, त्यामुळे आहारात मोड आलेले कडधान्य, पालेभाज्या, फळे इत्यादी पदार्थांचा समावेश करावा.
रक्तातील साखर नियंत्रणात राहते
मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी किंवा इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्यांनी आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश करावा, यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहून शरीरसंबंधित इतर समस्या उद्भवत नाहीत. कडधान्यांमधील फायबर हृद्य आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
कडधान्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, सिलिका असल्याने केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी कडधान्ये फायदेशीर आहेत. त्यामुळे बदलत्या हवामानामुळे काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते. कडधान्ये अनेक पोषक घटकांनी समृद्ध असतात. त्यामुळे रोजच्या नाश्त्यात कडधान्यांचा समावेश असावा.
हेही वाचा >> Cinnamon benefits: महिलांनो आहारात आजच दालचिनीचा समावेश करा; मिळतील ‘हे’ कमाल फायदे
तुम्ही रात्री मोड आलेली कडधान्ये खावीत का?
पोषणतज्ज्ञ अमिता गद्रे स्पष्ट करतात की, रात्रीच्या वेळी कडधान्ये खाणे चांगले आहे.. मात्र ज्यांना सूज येणे, गॅस किंवा अपचनाचा त्रास होतो त्यांनी दिवसाच त्याचे सेवन करावे.
कडधान्याचे सेवन कसे करावे?
पोषणतज्ज्ञ गद्रे सांगतात की, कडधान्ये वाफवून किंवा हलकीशी शिजवून खावीत. कच्च्या कडधान्यांमुळे बहुतेक लोकांना त्रास होऊ शकतो