सध्याच्या काळात अनेकांची जीवनशैली ही अतिशय धावपळीची आहे. ऑफिसला लवकर पोहोचण्यापासून ते मुलांना शाळेत सोडण्यापर्यंतच्या विविध कामांमुळे अनेकजणांचे आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष होते. शिवाय गडबडीत घराबाहेर पडण्यासाठी लवकरात लवकर तयार होऊ शकतो अशा पदार्थ म्हणून लोक डाळ आणि भात शिजवतात किंवा इतर आणखी झटपट होणारे मॅगी सारखे पदार्थ खाऊन घराबाहेर पडतात. मात्र, असे करणाऱ्या लोकांच्या आरोग्यासाठी दररोज एकसारखे अन्नपदार्थ खाणं खूप हानिकारक ठरु शकतं शिवाय या सवयीमुळे तुमच्या शरीराला अनेक आजारांचा सामनाही करावा लागू शकतो. त्यामुळे दररोज एकाच प्रकारचे अन्न खाण्याचे काय तोटे आहेत ते जाणून घेऊया.
हेही वाचा- २०३५ पर्यंत जगभरातील ५० टक्याहून अधिक लोकांना ‘हा’ आजार होणार? तुम्हाला किती धोका कसे राहाल सावध…
पोषक तत्वांची कमतरता –
रोज एकसारखे आणि तेच तेच अन्न खाल्ल्याने अशक्तपणा येऊ शकतो. यासोबतच इतर पोषक तत्वांचीही कमतरता भासू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात काहीतरी बदल करायला हवा. जे आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल आणि चवदारही असेल.
हेही वाचा- पुरुष नपुंसक होण्याचं प्रमाण का वाढतंय? लठ्ठपणा तर कारणीभूत नाही…
इटिंग डिसऑर्डर –
इटिंग डिसऑर्डर ही एक मानसिक स्थिती आहे जी चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे उद्भवते, म्हणूनच दररोज एकसारखे अन्न खाल्ल्याने इटिंग डिसऑर्डरची समस्या सुरू होते. त्यामुळे अनेकांना कुपोषणाच्या समस्येलाही सामोरं जावं लागू शकतं.
डायटिंग करणाऱ्यांसाठी धोकादायक –
लठ्ठपणामुळे त्रस्त झालेले लोक आपले वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा लोकांनी चुकूनही एकसारखे अन्न खाऊ नये. कारण एकसारख्या पोषक तत्वांचा अतिरेक झाल्यास तुमचे वजन वाढू शकते. त्यामुळे शरीराला इतर अनेक आजारांचा सामना करावा लागू शकतो.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, अधिकच्या माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा)