आपलं अन्न हे व्यवस्थित शिजवलेलंच असलं पाहिजे हे अगदी योग्य आहे. परंतु, आपल्या आहारात असेही काही पदार्थ असतात जे कच्चे खाणंच शरीरासाठी अधिक पोषक असतं. कच्चा अन्न आहार ही खरंतर शाकाहारामधीलच एक संकल्पना आहे. ह्यात मुख्यतः विविध फळं, भाज्या, ड्राय फ्रुट्स, कडधान्य यांसारख्या पदार्थांचा समावेश असतो. मुख्य म्हणजे हे अन्नपदार्थ कच्चे असल्याने त्यात तेलाचा समावेश बिलकुल नसतो. त्यामुळे अर्थात कॅलरीज देखील कमी असतात. शिवाय या विशिष्ट पदार्थांमध्ये अनेक पौष्टिक घटक तर असतातच. एक लक्षात घ्यायला हवं कि, आपल्या आहारात असलेल्या काही अन्नपदार्थांना अधिक उष्णता मिळाली कि त्यांतील पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्सची संख्या कमी होते. दरम्यान, आज आपण अशाच काही पदार्थांबाबत जाणून घेणार आहोत जे जे कच्चे खाल्ल्याने आपल्या शरीराला अधिक पोषक घटक मिळतात.

  • कांदा

भारतीय घरांमध्ये सर्वात जास्त वापरली जाणारी एक भाजी म्हणजे कांदा. जवळपास आपल्याकडे बनणाऱ्या सगळ्या डाळी, भाज्या, उसळी आणि कालवणांमध्ये कांदा हमखास वापरला जातो. पण सॅलडच्या माध्यमातून कच्चा कांदा खाणं आपल्या एकूण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं. कांद्यामध्ये असंख्य अँटीऑक्सिडंट्स असतात जे आपल्या यकृतासाठी उत्तम असतात. अॅलिसिन नावाच्या संयुगामुळे कांद्याला एक वेगळाच सुगंध देखील असतो. कच्चा खाल्ल्याने कांद्यातील अॅलिसिन हे हृदयरोग रोखण्यास, हाडांची घनता वाढवण्यास आणि रक्तदाब अर्थात ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतं.

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
सोनु सुदने चपाती खाणे केले बंद! चपाती खाणे पूर्णपणे बंद केल्यास तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल?
Health benefits associated with boiled food
Gurmeet Choudhary: दीड वर्ष साखर, चपाती, भात अन् भाकरी खाल्लीच नाही तर तुमच्या शरीरावर काय परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचे मत…
When's The Best Time To Eat Rice? to burn fats and calories also keeps blood sugar in control health tips
मंडळी आता भात न सोडता वजन व ब्लड शुगरवर मिळवा नियंत्रण! तज्ज्ञांनी सांगितली भात खाण्याची योग्य वेळ
gul poli
“तिळगुळ घ्या, गोड गोड बोला!” संक्रातीनिमित्त झटपट बनवा खमंग खुसखुशीत तिळाची पोळी! ही घ्या रेसिपी
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे
  • बीट

बीट ही एक लोहाने परिपूर्ण अशी भाजी आहे. विशेषतः सॅलड आणि ज्यूसच्या स्वरूपात तिचं सेवन केलं जातं. बीट कच्च खाल्ल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. तर व्यायामापूर्वी बीट खाल्ल्यास आपल्या शरीराला ऊर्जा देखील मिळते.

  • मोड आलेली कडधान्य

न्यूट्रिशनिस्ट अनुपमा मेनन यांच्या मते, “कोणत्याही कडधान्याला मोड येण्याची प्रक्रिया ही त्यांतील पोषण मूल्य अनेक पटींनी वाढवते. त्यातही जर ही मोड आलेली कडधान्य आपण कच्ची खाल्ली तर आपल्या शरीराला ‘व्हिटॅमिन सी’मुळे अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. अति प्रमाणात उष्णता लागल्याने पदार्थातील ‘व्हिटॅमिन सी’ नष्ट होतात. तसेच जेवण बनवण्याच्या अन्य अनेक पद्धतींमुळे पदार्थातील अनेक व्हिटॅमिन्स नष्ट होऊ शकतात. म्हणूनच, मोड आलेली कच्ची कडधान्य (जे व्हिटॅमिन बी आणि सी ने समृद्ध आहेत) खाणं ही एक अत्यंत चांगली कल्पना आहे.

  • टोमॅटो

टोमॅटो हा आपल्या रोजच्या आहाराचा एक भाग आहे. जेवणात विविध पद्धतीने आपण त्याचा वापर करत असतो. आपल्याकडे वेगवेगळ्या ग्रेव्हीज, भाज्या, कालवणांपासून आणखीही अनेक पदार्थांमध्ये टोमॅटोचा सर्रास वापर केला जातो. परंतु, टोमॅटोमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स हे शिजवल्यानंतर कमी होऊ शकतात. त्यामुळे, टोमॅटो देखील कच्चे खाणंच अधिक गुणकारी असतं. मुख्यतः त्याचा सॅलडमध्ये समावेश करणं अधिक योग्य ठरतं.

  • लसूण

लसूण कच्ची खाणं हे कदाचित अनेकांना आवडणार नाही. परंतु, कच्च्या लसणीचे शरीराला अनेक फायदे देते. सर्वोत्तम परिणामांसाठी, सकाळी लसूण आणि लवंग घ्या. त्याचे बारीक तुकडे करा. त्यावर काही थेंब मध टाका आणि हे मिश्रण थोडा वेळ चघळून खा. कच्च्या लसणीचे अनेक औषधी फायदे आहेत. आठवड्यातून दोन किंवा अधिक वेळा हे मिश्रण खाल्ल्याने फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. सोबतच कच्चा लसणीमुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो.

  • ड्राय फ्रुट्स

भाजलेला सुका मेवा अर्थात भाजलेले ड्राय फ्रुट्स हे खारट किंवा गोड चवीचे असू शकतात. या पद्धतीने खाल्ल्यास ते अत्यंत स्वादिष्ट देखील लागतात. परंतु ड्राय फ्रुट्स कच्चे खाणं हा एक अधिक आरोग्यदायी पर्याय आहे. भाजलेल्या ड्राय फ्रुट्समध्ये मीठ किंवा साखर मिसळल्याने त्यातली कॅलरीज वाढतात. बदाम, अक्रोड, काजू, पिस्ता आणि अन्य अनेक ड्राय फ्रुट्स हे मुळतःच अत्यंत चविष्ट आणि पौष्टिक असतात. परंतु, भाजल्याने त्यांतील अँटिऑक्सिडंट आणि व्हिटॅमिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. त्यामुळे ते कच्चे खाणं उत्तम.

  • ब्रोकोली

ब्रोकोली ही एक अत्यंत पौष्टिक भाजी मानली जाते. दैनंदिन आहारात या भाजीचा समावेश करणं उत्तम असल्याचं म्हटलं जातं. ब्रोकोलीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात. या गडद हिरव्या रंगाच्या भाजीमध्ये सल्फोराफेन नावाचं एक संयुग आहे जे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यास मदत करतं. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी तुम्ही या भाजीचा आपल्या सॅलडमध्ये नक्कीच समावेश करू शकता. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही ब्रोकोलीला एक किंवा दोन मिनिटांसाठी हलके शिजवू शकता. परंतु, जास्त शिजवणे टाळा. त्याचसोबत, त्यापूर्वी ब्रोकोली मिठाच्या पाण्यात भिजवून स्वच्छ करण्यास विसरू नका.

Story img Loader