Avoid leafy vegetables in the monsoon season: हिरव्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतीलच. घरातील प्रत्येक मोठी व्यक्ती आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाव्या हे आवर्जून सांगत असते. मात्र, सध्या पावसाळा ऋतू असल्यामुळे पाऊस जोमात चालू आहे. अशावेळी योग्य सकस आहार खाल्ला गेला पाहिजे. मात्र, ह्याच हिरव्या भाज्या पावसाळ्यात पण ही हिरवी भाजी पावसाळ्यात आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात, परंतु पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात. या हंगामात हिरव्या पानांमध्ये छोटे किडे गुंतलेले असतात. कधीकधी पानांना छिद्रही नसतात तरीही ते दूषित असतात. असे जंतू डोळ्यांनी दिसू शकत नाहीत, परंतु ते तुमच्या शरीराला खूप हानी पोहोचवू शकतात. पावसाच्या वेळी त्यांचे सेवन केल्याने पित्ताचा रस जास्त प्रमाणात स्राव होतो, त्यामुळे पोटात अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो .म्हणूनच या ऋतूत खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे योग्य ठरते. या ऋतूत तुम्ही तुमच्या आहारात काय समाविष्ट करावे आणि काय करू नये ते जाणून घ्या.
‘या’ भाज्या खाऊ नये
१) वांगी खाऊ नका
पावसाळ्यात वांग्यावर कीटकांचा प्रादुर्भाव जास्त असतो ज्यामुळे ही भाजी दूषित होते. अशा स्थितीत याच्या सेवनामुळे पचनसंस्थेच्या समस्यांचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात वांगी खाणे सहसा टाळावे.
( हे ही वाचा: Mansoon Tips: पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय सर्दी आणि ताप कमी करतील; रोगप्रतिकारक शक्ती देखील होईल मजबूत)
२) कच्ची कोशिंबीर खाणे टाळा
पावसाळ्यात कच्ची कोशिंबीर खाऊ नये कारण कच्च्या सॅलडमध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. त्याऐवजी कोशिंबीर वाफवून खाणे अधिक फायदेशीर ठरते. वाफेवर गरम केल्याने सॅलडमधील बॅक्टेरिया नष्ट होतात.
३) बटाटे आणि अरबी खाणे टाळा
बटाटे, अरबी सारख्या भाज्या खाणे टाळा, कारण त्या खाल्ल्याने जडपणा येतो आणि कमकुवत पचनामुळे गॅस-ऍसिडिटीची समस्या उद्भवू शकते. या भाज्यांमुळे संसर्गही होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात बटाटा, अरबी यांसारख्या भाज्या खाणे सहसा टाळावे.
( हे ही वाचा: बीटरूट लाडू आरोग्यासाठी आहेत फायदेशीर; जाणून घ्या कृती)
४) फास्ट फूड
पावसाळ्यात संसर्ग टाळण्यासाठी बाहेरचे काहीही खाणे टाळा. स्वच्छतेची विशेष काळजी न घेतल्यास या हंगामात रोगराई पसरण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे पावसाळ्यात सहसा बाहेरचे फास्ट फूड खाऊ नका. यामुळे तुमच्या आरोग्यावर देखील त्याचा परिणाम होईल.
पावसाळ्यात आहारात काय समाविष्ट करावे –
१) हर्बल चहा
पावसाळ्यात थंडी असते. या ऋतूत हर्बल चहा पिणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. इच्छित असल्यास, हर्बल चहामध्ये आले, काळी मिरी आणि मध वापरता येईल. याने चहाची चव देखील वाढेल. तसच या चहामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील चांगली होईल.
( हे ही वाचा: सकाळी ‘या’ सवयींनी दिवसाची सुरुवात करा; आरोग्य चांगले राहील)
२) लसणाचा वापर
लसूण खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. भाजीमध्ये मसाल्यांसोबत लसूण घातल्यासही चव येते. जेवणात लसणाचा वापर केल्याने आरोगयास भरपूर फायदे होतात.
३) व्हिटॅमिन सी
पावसाळ्यात पचनसंस्था कमकुवत असल्याने व्हिटॅमिन सी युक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेले अन्न तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवते, ज्यामुळे एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा आजारी पडत नाही. यासाठी संत्री, लिंबू, एवोकॅडो यांसारखे व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ खा.