Avoid leafy vegetables in the monsoon season: हिरव्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतीलच. घरातील प्रत्येक मोठी व्यक्ती आपल्याला हिरव्या पालेभाज्या खाव्या हे आवर्जून सांगत असते. मात्र, सध्या पावसाळा ऋतू असल्यामुळे पाऊस जोमात चालू आहे. अशावेळी योग्य सकस आहार खाल्ला गेला पाहिजे. मात्र, ह्याच हिरव्या भाज्या पावसाळ्यात पण ही हिरवी भाजी पावसाळ्यात आपल्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. पावसाळ्यातील ओलाव्यामुळे हिरव्या पालेभाज्यांमध्ये जंतू वाढण्याचा धोका असतो. सामान्य दिवसांमध्ये, हे जंतू कडक सूर्यप्रकाशात मरतात किंवा निष्क्रिय होतात, परंतु पावसाळ्यात ते अधिक सक्रिय असतात. या हंगामात हिरव्या पानांमध्ये छोटे किडे गुंतलेले असतात. कधीकधी पानांना छिद्रही नसतात तरीही ते दूषित असतात. असे जंतू डोळ्यांनी दिसू शकत नाहीत, परंतु ते तुमच्या शरीराला खूप हानी पोहोचवू शकतात. पावसाच्या वेळी त्यांचे सेवन केल्याने पित्ताचा रस जास्त प्रमाणात स्राव होतो, त्यामुळे पोटात अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो .म्हणूनच या ऋतूत खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देणे योग्य ठरते. या ऋतूत तुम्ही तुमच्या आहारात काय समाविष्ट करावे आणि काय करू नये ते जाणून घ्या.
पावसाळ्यात ‘या’ हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यास हानीकारक ठरू शकते; जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम
हिरव्या भाज्या खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकलेच असतील, पण अशा अनेक हिरव्या भाजा आहेत ज्या पावसाळ्यात फायद्याऐवजी आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 19-07-2022 at 17:36 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating these green leafy vegetables during monsoons can be harmful to health know its side effects gps