केक, शीतपेय किंवा इतर गोड पदार्थ तुम्हाला खूप आवडत असले, तरी ते खाणे कमी करा. कारण, या पदार्थांमुळे आपल्या बौद्धिक क्षमतेवर दुष्परिणाम होऊ शकतो. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी उंदरांवर केलेल्या प्रयोगातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. केक, कुकी, जेली, जॅम आणि शीत पेये यांसारख्या पदार्थांचे अतिसेवन केल्यास जेमतेम सहा आठवड्यांत वेडसर दिसायला होते. यावर संशोधन करणाऱ्या गोमेज पिनाला म्हणाले, “आपण जे खातो, तसेच आपले विचार बनत असल्याचे या परीक्षणाअंती समोर आले आहे.” ‘लाईव्ह सायन्स’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखानुसार सतत गोड खाल्ल्याने मेंदू सुस्तावतो आणि स्मरणशक्ती कमी होत जाते. यावर उपाय म्हणजे ओमेगा-३ फॅटी ऍसिड असणारे अन्न जेवल्याने हा धोका कमी होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा