‘अ‍ॅन अ‍ॅपल अ डे किप्स डॉक्टर अवे’ हे इंग्रजीमधील प्रसिद्ध वाक्य आहे. याचा अर्थ असा की दररोज एक सफरचंद खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहू शकता, ज्यामुळे तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची गरज भासणार नाही. सफरचंद शरीरासाठी आरोग्यदायी फळ मानले जाते. तज्ञ मंडळी दररोज सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशी पोषक तत्त्वे आढळतात, ज्यामुळे निरोगी राहण्यास मदत होते. आरोग्यासाठी असे अनेक प्रकारे फायदेशीर असणारे हे फळ अतिप्रमाणात खाल्ल्याने नुकसानकारक देखील ठरू शकते. अतिप्रमाणात सफरचंद खाल्ल्याने कोणत्या समस्या उद्भवू शकतात जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सफरचंद खाल्ल्याने उद्भवू शकतात या समस्या

आणखी वाचा : तुम्हाला सतत तहान लागते का? हे असु शकते गंभीर आजाराचे लक्षण; लगेच जाणून घ्या

पचनाशी निगडित समस्या
शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायबर महत्त्वाची भूमिका बजावते. सफरचंदात मुबलक प्रमाणात फायबर आढळते. पण जर शरीरात फायबरचे प्रमाण वाढले तर पचनाशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. फायबरच्या जास्त सेवनाने पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता अशा समस्या उद्भवू शकतात. एका दिवसात ७० ग्रॅमपेक्षा जास्त फायबरचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अतिप्रमाणात सफरचंद खाणे टाळावे.

लठ्ठपणा
एका सफरचंदात साधारणपणे २५ ग्रॅम कार्बोहायड्रेट असतात. दररोज अति प्रमाणात सफरचंदाचे सेवन केल्याने ती व्यक्ती लठ्ठपणाची शिकार होऊ शकते. निरोगी राहण्यासाठी दररोज एक सफरचंद खाणे पुरेसे असते.

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते
सफरचंदामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहायड्रेट्स आणि साखर असते. त्यामुळे याच्या अति सेवनाने रक्तातील साखर वाढण्याची शक्यता असते.

दात खराब होऊ शकतात
सफरचंदामध्ये ॲसिड असते. त्यामुळे अतिप्रमाणात सफरचंद खाल्ल्याने दात खराब होण्याची शक्यता असते.

Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण

ॲलर्जी
काही जणांना फळं खाल्ल्याने ॲलर्जी होते. अशा व्यक्तींना अतिप्रमाणात सफरचंद खाल्ल्याने जास्त त्रास होऊ शकतो. फळांची ॲलर्जी असणाऱ्या व्यक्तींना सफरचंद खाल्ल्याने पोटदुखी, मळमळ, उलटी असा असह्य त्रास होऊ शकतो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating too many apples can cause these health issues know more pns