अंडी हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत मानला जातो. हे असे पोषक तत्व आहे ज्याद्वारे आपले स्नायू मजबूत होतात. यामुळेच जिममध्ये वर्कआउट करणाऱ्या लोकांना उकडलेले अंडे खायला सांगतात. उकडलेली अंडी खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळत असली, तरीही हे जास्त प्रमाणात खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. उकडलेली अंडी खाल्ल्यानेही काही दुष्परिणाम होतात, त्यामुळे ते मर्यादित प्रमाणात खावे, असे अनेक आरोग्यतज्ञांचे मत आहे. उकडलेल्या अंड्यांच्या आहारातील सर्वात मोठी समस्या ही आहे की त्यावरच अवलंबून राहून, आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक तत्व मिळत नाहीत.

जे लोक उकडलेल्या अंड्यांचा आहार घेतात ते अनेकदा मका, बटाटा, वाटाणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींपासून अंतर राखू लागतात, ज्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक महत्त्वाचे पोषक घटक कमी होऊ लागतात. याचा परिणाम संतुलित आहारावर होत असल्याने उकडलेले अंडे खाण्यासोबतच आवश्यक पदार्थांचाही आहारात समावेश करावा.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

जर तुम्ही दररोज जिम करण्यासोबतच प्रतिदिन २ उकडलेली अंडी खात असाल तर हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक नाही. पण यासोबत तुम्ही इतर हेल्दी पदार्थही खात राहा. अंड्यांमध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि कोलेस्टेरॉल देखील असते, जे हृदय आणि यकृताला हानी पोहोचवू शकते. जे अंडी जास्त प्रमाणात खातात त्यांना हृदयविकाराचा धोका असतो. तथापि, मर्यादित प्रमाणात उकडलेली अंडी खाणाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)