भारतीय आहारात पोळी / चपाती हा सर्वांच्या आवडीचा एक प्रमुख पदार्थ आहे. अनेकांना दिवसातून दोन्ही वेळी जेवणात फक्त चपाती आणि भाजी खायला आवडते. मात्र, काही लोकांसाठी, गव्हाची चपाती खाल्ल्याने आरोग्यविषयक समस्या उद्भ्ऊ शकतात. ज्यामुळे आपली दैनंदिन दिनचर्या ढासळू शकते. आता तुम्ही म्हणत असाल की, काय बोलता राव? आम्ही तर लहानपणापासून हेच खात आलोय! आम्हाला तर काहीच झालं नाहीये. मात्र, मंडळी अतिआत्मविश्वास आपलं आरोग्य धोक्यात टाकू शकतो. त्यामुळं वेळीच सावध झालेलं बरं. नाही का? चला तर जाणून घेऊया आपल्या गव्हाच्या पोळीबद्दल, अहो!अर्थातच चपातीबद्दल.
शरीरात ऑक्सालेटची मात्रा धोकादायक!
ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये ऑक्सालेटची मात्रा मर्यादेपेक्षा जास्त असते, अशा व्यक्तींसाठी गव्हाची पोळी खाणे धोकादायक ठरते. अशा व्यक्तीने गव्हाच्या पोळीपासून लांबच राहायला पाहिजे. गव्हाच्या पोळीमध्ये ऑक्सालेटची मात्रा जास्त असते आणि म्हणूनच आपण दिवसभरातून अनेक वेळा चपाती खात असतो. जर या घटकाची मात्रा आपल्या शरीरामध्ये मर्यादेपेक्षा जास्त वाढल्यास भविष्यात आपल्याला अनेक गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात.
पोळी / चपाती / भाकरी इत्यादींमधील कॅलरिजचे प्रमाण
१ बाजरीची भाकरी– ९७ कॅलरिज
१ नाचणीची भाकरी– ८८ कॅलरिज
१ मक्क्याची रोटी – १५३ कॅलरिज
१ थालिपीठ – १०० कॅलरिज
१ तंदुरी रोटी – ११६ कॅलरिज
१ फुलका – ५७ कॅलरिज
१ रुमाली रोटी – ७८ कॅलरिज
१ ज्वारीची भाकरी– ३० कॅलरिज
या विविध पोळ्यांमधील कॅलरीज पाहून त्यांची निवड करू नका. इतर पोळ्यांच्या तुलनेत गव्हाच्या चपातीमध्ये कमीत कमी कॅलरिज असतात. सामान्यपणे एका वेळेस एक व्यक्ती २-३ पोळ्यांचा आहारात समावेश करते. मात्र, वजन घटवणार्यांनी त्यांच्या आहाराकडे लक्ष द्यावे कारण पोळ्यांचा आहारात अधिक समावेश करून कॅलरीज वाढवण्यापेक्षा एखादी पोळी कमी करून त्याऐवजी फळं किंवा भाजीचा आहारात समावेश करावा.
चपाती खाल्ल्यानंतर फुगल्यासारखे वाटते?
पोळी जेवणात अधिक असल्याने आपल्याला कधी कधी पोटात जड वाटायला लागते. कारण पोळी पचायला जड असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. ते होताना त्याची काही लक्षणे खालील प्रमाणे सांगता येईल.
१.दमा
२.पाणी धारणा आणि जडपणा
३.आर्टिकेरिया
४.इसब
५.स्नायू कडक होणे
६.अशक्तपणा किवा थकवा
७.ताठ सांधे
८.पोटदुखी किवा सूज येणे
वरिल प्रमाणे आपल्याला चपाती किवा पोळी अधिक खाणाऱ्यांमध्ये ही लक्षणे दिसून येतील. पोटाचे आजार मोठया प्रमाणात उद्भ्वत असतीत तर आपण चांगल्या आहार तज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.