प्रत्येक व्यक्तीला आपण आकर्षक दिसावे असे वाटत असते. त्यासाठी जिम, डाएट यांसारखे अनेक पर्याय अवलंबले जातात. वजन जरा जरी वाढले तरी व्यायामावर अधिक भर दिला जातो. काहीजण वाढलेल्या वजनाचे इतके टेंशन घेतात की पूर्णपणे जेवण सोडून देतात. असा चुकीच्या पद्धतीमुळे त्यांना नंतर अशक्तपणा, थकवा अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कोणत्याही पद्धतीचा अवलंब करण्याआधी तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण तज्ञांच्या मते जेवणाची वेळदेखील वजन कमी करण्यास मदत करू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वजन कमी करायचे असेल तर काही जण जेवणावर अतिप्रमाणात नियंत्रण ठेवतात. काहीजण गरजेपेक्षा जास्त स्ट्रिक्ट डाएट करतात.पण कधीकधी त्याचाही काही उपयोग होत नाही. तज्ञांच्या मते प्रत्येक व्यक्तीने परिपूर्ण आहार घेतला पाहिजे. वजन कमी करण्यासाठी अन्नाचा त्याग करण्याची गरज नाही. उलट योग्य आणि परिपूर्ण आहार घेण्याची गरज असते. योग्य आणि परिपूर्ण आहार म्हणजे ज्यात कार्ब, फॅट, प्रोटीन, आयर्न हे सर्व योग्य प्रमाणात असेल. तसेच अन्नपदार्थांमध्ये पोषक तत्वांचा समावेश असणे आवश्यक असते.

Health Tips : अशक्तपणा आणि थकवा जाणवतोय? हे पाच पदार्थ खा, नक्की मिळेल फायदा

वजन कमी करायचे असेल तर कोणत्या वेळी जेवावे?

‘ब्रिटिश जनरल ऑफ हेल्थ सायकॉलॉजी’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिसर्चनुसार वजन कमी करण्यासाठी जेवणाची वेळ देखील मदत करू शकते. एखाद्या व्यक्तीला भूक लागल्यानंतरच ती व्यक्ती जर जेवली, तर ही पद्धत वजन कमी करण्यास मदत करू शकते. भुक लागल्यावर जेवल्यानंतर वजन कमी होण्यास मदत होतेच पण त्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहते.

डायटिंगमुळेच वजन कमी होते असे नाही

वजन कमी करायचे असल्यास भूक लागली तरी काही खायचे नाही असा सल्ला बऱ्याच वेळा दिला जातो. पण तज्ञांच्या मते भूक लागल्यावर जेवण करणे योग्य आहे. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. म्हणजे केवळ डायटिंगमुळेच वजन कमी होते असे नाही. याउलट काही जण डायटिंगमुळे स्वतःच्या आरोग्याची हानी करुन घेतात. जेवण करणे टाळून अशक्तपणाला आमंत्रण देतात. त्यामुळे त्यांना सतत थकवा जाणवत राहतो. त्यामुळे योग्य आणि परिपूर्ण आहार घ्यावा असा सल्ला तज्ञ देतात.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eating when you are hungry helps to lose weight pns
Show comments