सकाळी दुधासोबत किंवा नाश्त्यात पांढरा पाव मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. सँडविच, ब्रेड पकोड्याच्या रुपात त्याचे सेवन केले जाते. लवकर तयार होत असल्याने, तसेच हल्केफुल्के असल्याने ते लवकर संपवता येते. याने पोट भरल्यासारखे वाटते, मात्र पांढरा पाव हा शरीराला नुकसान देखील करू शकतो.
ग्रेटर नोएडातील जीआयएमएस रुग्णालयात कार्यरत पोषणतज्ज्ञ डॉ. आयुषी यादव यांनी एका माध्यमाशी बोलताना सांगितले की, दररोज पांढरा पाव खाल्ल्याने शरीराला अनेक नुकसान होऊ शकतात. पांढऱ्या पाव ऐवजी होल ग्रेन किंवा मल्टी ग्रेन चपाती आरोग्यासाठी चांगली आहे, असा सल्ला आयुषी यांनी दिला.
(सावधान! आता क्रेड्रिट कार्डवर हॅकर्सचा डोळा, डेटा चोरी करण्यासाठी लढवत आहेत ‘ही’ शक्कल)
पाढरा पाव खाण्याचे ‘हे’ आहेत नुकसान
१) मिठाचे अधिक प्रमाण
बहुतांश पांढऱ्या पावात मिठाचे आणि प्रिझर्व्हेटिव्हचे प्रमाण अधिक असते. अनेक दिवस बाजारात विकरीसाठी ठेवावे लागत असल्याने या पदार्थांचा वापर होते. मात्र, ते आरोग्यासाठी अजिबात चांगले नसतात. कारण याने रक्तदाब वाढू शकते.
२) वजन वाढते
पाढऱ्या पावात कार्बोदके, रिफाइन्ड साखर आणि मीठ अधिक प्रमाणात असते ज्याने शरीराला अधिक नुकसान होऊ शकते. पांढरा पाव रोज खाल्ल्यास रक्तातील साखरेचे प्रमाण आणि फॅट वेगाने वाढेल. याने मधुमेह आणि लठ्ठपणा वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
(एलॉन मस्क यांची अनोखी एन्ट्री, ट्विटर मुख्यालयात चक्क नेले सिंक; बायोडेटाही केला अपडेट)
३) हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक
सोडियमचे प्रमाण अधिक असलेले पाव खाल्ल्यास रक्तदाब वाढण्याचा धोका असतो. उच्च रक्तदाबात रक्तवाहिन्यांद्वारे रक्त हृदयापर्यंत पोहोचवण्यासाठी जोर लावावा लागतो. याने कोरोनरी हर्ट डिसिज, ट्रिपल वेसल डिसिज होऊ शकते, तसेच हदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)