आजकाल अनेकजण वजन वाढण्याच्या समस्येने त्रस्त असतात, बदललेली जीवनशैली यामागचे कारण असू शकते. वजन वाढल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळते. यामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे आजार होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे जराही वजन वाढले की ते नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसतात. यासाठी काही पदार्थ खाणे देखील फायदेशीर ठरते. रोजच्या जेवणात कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्यास मदत मिळते जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पनीर
मांसाहारी खाद्यपदार्थांना पर्याय म्हणून पनीरचा आहारात समावेश केला जातो. पनीरमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळते. साधारण एक कप पनीरमध्ये २५ ग्रॅम प्रोटीन आढळते, त्यामुळे स्नॅक्ससाठी किंवा साईड डिश म्हणून पनीरचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरेल. तसेच यामध्ये कमी कार्बोहाइड्रेट आढळतात त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

दही
दह्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन असते. एक कप दह्यात २० ग्रॅम प्रोटीन असते. रोजच्या जेवणात दह्याचा समावेश केल्यास वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.

आणखी वाचा : ‘या’ भाज्या करतात High Blood Pressure नियंत्रित ठेवण्यासाठी मदत; लगेच करा आहारात समावेश

पिस्ता
पिस्ता फायबर, प्रोटीन, शरीरासाठी चांगले असणारे फॅट यांचे स्त्रोत मानले जाते. पिस्ता खाल्ल्याने पोट लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही.

उकडलेली अंडी
अंडी प्रोटीनचे उत्तम स्रोत मानली जातात. रोजच्या व्यायामानंतर अनेकजण अंडी खातात, यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)