Egg vs Paneer: Which is a healthier protein: आपल्या अन्नामध्ये सर्व प्रकारच्या पोषक तत्वांचा समावेश करणे आवश्यक आहे. प्रथिने शरीरासाठी आवश्यक असतात. जेव्हा आपल्या आहारात प्रोटीनची कमतरता असते तेव्हा शरीरात लक्षणे दिसू लागतात. प्रथिने हे आपल्या शरीरासाठी सर्वात महत्त्वाचे पोषक तत्त्वांपैकी एक आहे. हे एक सूक्ष्म पोषक आहे, जे स्नायूंची वाढ करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. याशिवाय प्रथिने खाल्ल्याने चयापचय वाढतो आणि अन्नाची लालसाही कमी होते. यामुळेच विशेषत: वजन कमी करण्याचा विचार करणारे लोक भरपूर प्रथिने खाण्याचा आग्रह धरतात. यासाठी बरेच लोक अंडी किंवा पनीर जास्त खातात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का या दोघांपैकी कोणते प्रोटीन जास्त आरोग्यदायी आहे आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे; चला जाणून घेऊयात अंडी की पनीर आरोग्यासाठी कोणता पदार्थ जास्त फायदेशीर.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हल्ली लोक त्यांच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक झाले आहेत आणि या संदर्भात ते त्यांच्या खाण्याकडेदेखील खूप लक्ष देऊ लागले आहेत. त्याचवेळी, अशा लोकांना प्रथिनेयुक्त आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. अशा स्थितीत प्रथिनांचे प्रमाण चांगले मिळावे यासाठी अंड्याचे सेवन करावे की पनीरचे याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. प्रथिनांचा उत्तम स्रोत कोणता आहे ते जाणून घ्या.

अंडी

अंडी हा प्रथिनांचा संपूर्ण स्रोत आहे. म्हणजेच, त्यामध्ये शरीराला विविध कार्यांसाठी आवश्यक असलेले सर्व आवश्यक अमिनो ॲसिड अंड्यामध्ये असतात. इतकंच नाही तर अंड्यांमध्ये असलेली प्रथिने शरीरात सहज शोषली जातात, त्यामुळे ते आणखी फायदेशीर ठरते.

दुसरीकडे जर आपण प्रथिनांच्या प्रमाणाबद्दल बोललो, तर अनेक आरोग्य अहवाल सूचित करतात की सामान्य आकाराच्या अंड्यामध्ये सुमारे ६ ते ७ ग्रॅम प्रथिने असतात. याशिवाय अंड्यामध्ये व्हिटॅमिन बी १२ आणि डी तसेच सेलेनियम आणि कोलीनसारखे खनिजेदेखील असतात.

पनीर

पनीर ही प्रोटीनचा एक उत्तम स्रोत आहे. आरोग्य अहवाल सूचित करतात की, १०० ग्रॅम पनीर खाल्ल्याने एखाद्या व्यक्तीला सुमारे १८ ग्रॅम प्रथिने मिळतात, ज्यामुळे ते या आवश्यक पोषक तत्त्वांचा एक मजबूत स्रोत बनते. प्रथिनांसह पनीरमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि व्हिटॅमिन बीदेखील चांगले असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी योगदान देतात. जे शाकाहारी आहार घेतात त्यांच्यासाठी पनीर हा एक योग्य पर्याय आहे.

प्रथिनांचा उत्तम स्रोत कोणता आहे? अंडी की पनीर

जर आपण अंडी आणि पनीरच्या प्रथिनांच्या फायद्याची तुलना केली तर, दोन्ही प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहेत. परंतु, अंडी पनीरपेक्षा अधिक आरोग्यदायी आहेत. म्हणजेच अंड्यामध्ये विविध शारीरिक कार्यांसाठी आवश्यक असलेली सर्व नऊ अमिनो ॲसिड असतात.

दुसरीकडे, पनीर हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे, परंतु अमिनो ॲसिडचे संपूर्ण फायदे पनीरच्या सेवनानं मिळत नाही, त्यामुळे अंडी आणि पनीरमधील निवड शेवटी वैयक्तिक आहारातील प्राधान्ये आणि पौष्टिक आवश्यकतांवर अवलंबून असते. अंडी आणि पनीर दोन्ही प्रथिनांच्या सेवनात महत्त्वपूर्ण योगदान देतात आणि संतुलित आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात.