Egg Yellow Part: अंडी हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हाडांच्या मजबुतीसाठी ते सर्व प्रकारच्या आजारांमध्ये अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. परंतु, तुम्ही पाहिले असेल की बहुतेक तज्ञ अंड्याचा पिवळा भाग खाण्याचा सल्ला देत नाहीत. हा भाग कोणात्या आजाराच्या रुग्णांसाठी नुकसानदायी ठरू शकतं हे जाणून घेऊयात.

वाढू शकते वजन

अनेक लोकांचा असा विश्वास आहे की अंड्याचा पिवळ्या भाग खाल्ल्याने जाड होतं. वास्तविक, त्यात जास्त चरबी असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. अशा स्थितीत वजन कमी करणाऱ्या लोकांनी अंड्याचा पिवळा भाग खाल्ला नाही तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

(हे ही वाचा: Weight Loss: वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे सोयाबीन; जाणून घ्या सोया चंक्स बिर्याणीची रेसिपी)

नुकसान काय?

अंड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे हृदयाचे नुकसान होऊ शकते.

याशिवाय जे लोक मधुमेहाचे रुग्ण आहेत त्यांनीही हा पिवळा भाग खाणे टाळावे, अन्यथा तुमची समस्या वाढेल.

रक्तदाबाच्या रुग्णांनीही अंड्यातील पिवळा भाग टाळावा. ते त्यांच्यासाठी अजिबात फायदेशीर नाही.

(येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वैद्यकीय सल्ला घ्या.)