Winter Skincare Tips In Marathi : त्वचेची संवेदनशीलता, उष्णता, कोरडेपणा यांच्याशी लढण्यासाठी स्किनकेअरचा वापर करणे खूप आवश्यक आहे. हिवाळ्यात थंड आणि कोरड्या हवेमुळे त्वचेला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. त्यामुळे थंडीत निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी योग्य अशी स्किनकेअर निवडणे खूप गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही थंडीत चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी स्किनकेअरमध्ये अंड्याचा समावेश करू शकता. हिवाळ्यात तुम्ही तुमच्या दैनंदिन स्किनकेअर रूटीनमध्ये अंड्याचा समावेश का करावा याची कारणे खालीलप्रमाणे (Eggs For Winter Skincare)…

१. मुरमे आणि ब्लॅकहेड्स काढणे (Acne and Blackheads Removal)

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Energy Booster Powder
अशक्तपणा दूर करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये घ्या घरच्या घरी बनलेली एनर्जी बूस्टर पावडर
Mooli ka raita recipe how to make muli ka raita mulyachi koshimbir recipe in marathi
हिवाळ्यात हा चटकदार पदार्थ खायलाच हवा, जेवण होईल चवदार; मुळ्याचे रायते कसे करायचे जाणून घ्या
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Algae found in ginger
महिलांनो तुम्हीही हिवाळ्यात जास्तीचं आले आणताय? एका महिलेला त्यात काय मिळालं पाहा; VIDEO पाहाल तर झोप उडेल
chatura loksatta marathi news
स्त्री आरोग्य : नववर्षाचा संकल्प; फिट राहा!

सेबम म्हणजे एक प्रकारचे तेल आहे. हे तेल त्वचेला मऊ, मुलायम व आर्द्र ठेवण्यास मदत करते. सेबमचे प्रमाण वय, लिंग, त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. तर, अंड्याचा पांढरा भाग सेबम रेग्युलेशन ॲबिलिटीजकरिता, स्राव नियंत्रित करण्यासाठी आणि घाम, प्रदूषणामुळे निर्माण होणारे अतिरिक्त सेबम शोषून घेण्याच्या क्षमतेसाठी आवश्यक मानला जातो. अंड्यामधील एपिडर्मिस तुम्हाला (epidermis) पुरळ आणि जळजळ होण्यापासून वाचवतो (Eggs For Winter Skincare) . त्याव्यतिरिक्त त्वचेची लवचिकता वाढवणे सुलभ होऊ शकते.

२. त्वचेचे हायड्रेशन (Skin Hydration)

अंड्यामध्ये बी १२ जीवनसत्तव असते, जे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कायम ठेवते आणि हायड्रेशनसाठी मदत करते. हे पोषक तत्त्व शरीराच्या उतींची दुरुस्तीही करते. सूर्याची अतिनील किरणे आणि प्रदूषण यांमुळे ओढवणाऱ्या पुढील समस्यांपासूनही त्वचेचे संरक्षण करते (Eggs For Winter Skincare). अंड्यामुळे आतडे निरोगी राहून, त्वचादेखील स्वच्छ राखली जाते.

हेही वाचा…Walking Pneumonia Vs Common Cold : वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय? वाचा, लक्षणे, उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला

३. चेहऱ्यावरील ओपन पोर्स कमी करते (Decreases Pores)

अंड्यामध्ये अल्ब्युमिन असते. अल्ब्युमिन हे एक असे पोषक तत्त्व आहे, जे त्वचेला ड्राय करते. त्वचेच्या छिद्रांमधील कचरासुद्धा बाहेर काढून टाकण्यास मदत करते. परिणामी ही छिद्रे कालांतराने आकुंचन पावतात आणि त्वचा स्वच्छ होते. त्याशिवाय ते त्वचेतून सेबम (sebum) देखील बाहेर काढून छिद्रे साफ करते.

४. त्वचेचा रंग (Skin Complexion )

अंड्यामध्ये ड जीवनसत्त्व असते, जे त्वचेचा रंग उजळण्यासाठी ओळखले जाते. अंड्यामध्ये ल्युटीन, झेक्सॅन्थिन हे घटकदेखील असतात. जे त्वचा आणि डोळ्यांचे किरणांपासून संरक्षण करण्यास मदत करतात. हे दोन महत्त्वाचे पोषक घटक त्वचेचे आरोग्य वाढवतात आणि संपूर्ण हिवाळ्यात तुमचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतात.

साइड इफेक्ट्स (Side Effects)

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी अंडे हा उत्तम पर्याय असला तरीही काही गोष्टींची काळजी घेणे मात्र खूप आवश्यक आहे. अंड्यातील काही घटक तुमच्या त्वचेसाठी खूप तीव्र किंवा अयोग्य ठरू शकतात. त्यामुळे तुम्हाला अंड्याची ॲलर्जी होत नाही ना याची खात्री करून घ्या. त्याव्यतिरिक्त अंड्याचा पांढरा भाग त्वचेच्या पृष्ठभागाच्या थरावर रासायनिक असंतुलन निर्माण करू शकतो आणि त्यामुळे चिडचिड होऊ शकते. तुम्हाला अशा समस्या जाणवल्या, तर कृपया तुमच्या त्वचारोगतज्ज्ञांना नक्की भेट द्या.

याव्यतिरिक्त जर तुम्हाला कोणताही त्रास होत नसेल, तर तुमच्या स्वयंपाकघरात जा आणि निरोगी, चमकदार त्वचेसाठी या सोप्या व परवडणाऱ्या स्किनकेअर रहस्यांचा नक्की वापर करा (Eggs For Winter Skincare)…

Story img Loader