दिल्ली सरकार आपल्या नवीन योजनेंतर्गत मॉल्स, कार्यालये, अपार्टमेंट, महाविद्यालये आणि शहरातील काही ठिकाणी लाइट इलेक्ट्रिक वाहनांसाठी वैयक्तिक चार्जर स्थापित करण्यासाठी २,५०० शुल्क आकारेल. खाजगी चार्जिंग स्टेशनसाठी सिंगल विंडो सिस्टम लाँच करताना, दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गहलोत यांनी घोषणा केली की ग्राहक संबंधित डिस्कॉम पोर्टलला भेट देऊन किंवा हेल्पलाइन नंबरवर कॉल करून खाजगी चार्जिंग स्टेशन स्थापित करू शकतात.
दिल्ली सरकार चार्जिंग स्टेशनसाठी पहिल्या 30,००० अर्जदारांना ६,००० ची सबसिडी देत आहे. सर्वात स्वस्त चार्जिंग स्टेशन ८,५०० आहे आणि सबसिडीनंतर अर्जदाराला फक्त २,५०० भरावे लागतील. गेहलोत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दिल्ली सरकारने दिलेल्या या प्रोत्साहनामुळे चार्जर्सची किंमत ७० टक्क्यांनी कमी होईल.कमी ईव्ही टॅरिफचा लाभ घेण्यासाठी अर्जदार नवीन वीज कनेक्शन (प्री-पेड मीटर) निवडू शकतात किंवा विद्यमान कनेक्शनसोबत राहू शकतात. ईव्ही चार्जरच्या स्थापनेसाठी किमान जागेची आवश्यकता असेल. एलईवी एसीला एक स्क्वेअर फूट आणि एसी ००१ ला दोन स्क्वेअर फूट लागेल, डीसी-००१ दोन स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाच्या आणि दोन मीटर उंचीच्या जमिनीवर बसवता येईल.
( हे ही वाचा: विराट कोहली, रवी शास्त्री आणि भरत अरुण यांचा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद; व्हिडीओ व्हायरल )
दिल्ली संवाद आणि विकास आयोगाच्या उपाध्यक्ष जास्मिन शाह यांनी दावा केला की, भारतात प्रथमच मॉल्स, कार्यालये, रुग्णालये, निवासी सोसायट्या, महाविद्यालयांमध्ये खाजगी चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सिंगल विंडो सिस्टीम सुरू करण्यात आली आहे. या ईव्ही चार्जिंग पॉइंट्सद्वारे वापरल्या जाणार्या विजेसाठी सरकारने निश्चित केलेला दर ४.५ प्रति युनिट आहे.
( हे ही वाचा: आनंद महिंद्रा म्हणतात “तुम्हाला पराभवाची भीती वाटते?” तर या लहान मुलाचा व्हिडीओ नक्की पाहा )
गेहलोत म्हणाले, “भारतात प्रथमच ईव्ही चार्जर बसविण्यासाठी अशी सोयीस्कर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि त्यांच्या स्थापनेमुळे दिल्ली हे जगातील सर्वोत्कृष्ट शहर बनले आहे जिथे सर्वत्र ईव्ही चार्जिंग पॉइंट आहेत. ते पुढे म्हणाले की, “आता कोणीही फक्त २,५०० च्या कनेक्शनच्या खर्चात वैयक्तिक ईवी चार्जर स्थापित करा. आम्ही एक चांगले वातावरण तयार केले आहे, जे आगामी काळात दिल्लीच्या रस्त्यावर अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने धावतील याची खात्री होईल.”