हे वर्ष संपायला आता केवळ काही दिवस राहिले आहेत. नवीन वर्षाचे स्वागत अगदी दणक्यात करायचे असेसुद्धा अनेकांनी ठरवले असेल. १ तारखेपासून बरेचजण पुन्हा आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यास सुरू करतील; काही आपले छंद जोपासायचा प्रयत्न करतील, तर काही या वर्षी राहिलेल्या गोष्टी, फिरण्याचे, बाहेर जाण्याचे हे सर्व प्लॅन्स पुढच्यावर्षी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. पण, या सर्व गोष्टी करण्यासाठी मात्र तुम्हाला कॉलेजमधून, ऑफिसमधून छान सुट्ट्या मिळायला हव्या… नाही का?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण सुट्टी मागितली आणि ती मिळालीच नाही, तर अर्ध्याहून जास्त प्लॅनिंग्स तसेच पडून राहतात. परंतु, या वर्षीची राहिलेली ‘बकेट लिस्ट’ पुढच्यावर्षी मात्र नक्की पूर्ण करता येऊ शकते. कारण – २०२४ हे वर्ष एक-दोन नाही, तर चक्क १० लॉन्ग वीकेंड्स घेऊन येत आहे! आता अश्या सुट्ट्या जर लागून येणार असतील तर तुमचे सर्व प्लॅन्स तुम्हाला अगदी सहज पूर्ण करता येणं शक्य आहे. या सुट्ट्या नेमक्या कशा मिळणार आहेत आणि त्यांचा फायदा तुम्ही कसा करून घेऊ शकता हे पाहा.

२०२४ वर्षाच्या सुट्ट्यांचे वेळापत्रक काय आहे पाहा.

हेही वाचा : सकाळच्या ‘या’ सवयी ठेवतील तुम्हाला तंदुरुस्त; हिवाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्यायची पाहा…..

जानेवारी २०२४ मधील सुट्ट्या

या वर्षाच्या शेवटच्या दिवसांपासूनच नववर्षाचे लॉन्ग वीकेंड्स सुरू होत आहेत.

३० डिसेंबर शनिवार
३१ डिसेंबर रविवार
१ जानेवारी सोमवार
२ जानेवारी मंगळवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

१३ जानेवारी शनिवार [लाहोरी]
१४ जानेवारी रविवार
१५ जानेवारी सोमवार [मकर संक्रांत, पोंगल]
१६ जानेवारी मंगळवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

२६ जानेवारी शुक्रवार [प्रजासत्ताक दिन]
२७ जानेवारी शनिवार
२८ जानेवारी रविवार

मार्चमधील लॉन्ग वीकेंड्स

८ मार्च शुक्रवार [महाशिवरात्र]
९ मार्च शनिवार [गुढी पाडवा]
१० मार्च रविवार

२३ मार्च शनिवार
२४ मार्च रविवार
२५ मार्च सोमवार [होळी]
२६ मार्च मंगळवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

२९ मार्च शुक्रवार [गुड फ्रायडे]
३० मार्च शनिवार
३१ मार्च रविवार [ईस्टर]

मेमधील लॉन्ग वीकेंड्स

२३ मे गुरुवार [बौद्ध पौर्णिमा]
२४ मे शुक्रवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]
२५ मे शनिवार
२६ मे रविवार

जूनमधील लॉन्ग विकेंड

१५ जून शनिवार
१६ जून रविवारी
१७ जून सोमवार [बकरी ईद]
१८ जून मंगळवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

हेही वाचा : प्रवाशांसाठी खुशखबर! बाईक टॅक्सी अन् रिक्षानंतर आता रॅपीडोची ‘ही’ सेवा होणार सुरु; जाणून घ्या…

ऑगस्टमधील लॉन्ग विकेंड

१५ ऑगस्ट गुरुवार [स्वातंत्र्य दिन]
१६ ऑगस्ट शुक्रवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]
१७ ऑगस्ट शनिवार
१८ ऑगस्ट रविवार
१९ ऑगस्ट सोमवार [रक्षाबंधन]

२४ ऑगस्ट शनिवार
२५ ऑगस्ट रविवार
२६ ऑगस्ट सोमवार [जन्माष्टमी/गोकुळाष्टमी]
२७ ऑगस्ट मंगळवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

सप्टेंबरमधील लॉन्ग विकेंड

५ सप्टेंबर गुरुवार [ओनम]
६ सप्टेंबर शुक्रवार [ऑप्शनल सुट्टी]
७ सप्टेंबर शनिवार [गणेश चतुर्थी]
८ सप्टेंबर रविवार

१४ सप्टेंबर शनिवार
१५ सप्टेंबर रविवार
१६ सप्टेंबर सोमवार [ईद-ए- मिलाद]

ऑक्टोबरमधील लॉन्ग विकेंड

११ ऑक्टोबर शुक्रवार [महानवमी]
१२ ऑक्टोबर शनिवार [दसरा]
१३ ऑक्टोबर रविवार

नोव्हेंबरमधील लॉन्ग विकेंड

१ नोव्हेंबर शुक्रवार [दिवाळी]
२ नोव्हेंबर शनिवार
३ नोव्हेंबर रविवार [भाऊबीज]
४ नोव्हेंबर सोमवार [ऑप्शनल सुट्टी घ्या]

१५ नोव्हेंबर शुक्रवार [गुरु नानक जयंती]
१६ नोव्हेंबर शनिवार
१७ नोव्हेंबर रविवार

ही आहे पुढच्या वर्षाची म्हणजेच २०२४ ची लॉन्ग वीकेंड्सची यादी. यादीतील या सुट्ट्यांनुसार तुम्हाला तुमच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यास मदत होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Enjoy your holidays with this long list of weekends for year 2024 check out this list dha