Monsoon two wheeler Care Tips and Tricks:मान्सूनच्या काळात देशभरात पाऊस पडतो. पावसात उष्णतेपासून दिलासा मिळाला असला तरी टु व्हिलर किंवा स्कूटर चालवणाऱ्यांना त्रास होतो. भारतातील बहुतांश नोकरदार लोकही टु व्हिलरवरून प्रवास करतात. अशा वेळी पावसामध्ये अनेकवेळा वाहनांची ये-जा सुरू होते. मॉन्सूनमध्ये वातवरण कितीही सुंदर असले तरी त्यासोबत अनेक समस्यांचा सामना करावा लागते त्यापैकी एक म्हणजे रस्त्यावर साचणारे पाणी. पावसाळ्यात अनेकदा ओल्या रस्त्यावरून बाईक सटकते आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून टु व्हिलर नेल्यास ती बंद पडते.

जर तुमच्याकडेही बाईक किंवा स्कूटर असेल तर येथे तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही पावसाळ्यात तुमची टु व्हिलर सुरक्षित ठेवू शकता.

Car blast protection avoid putting these things in your car boot trunk car safety tips
चक्क बॉम्बसारखी फुटेल कारची डिकी; गाडीत ‘या’ गोष्टी ठेवत असाल, तर सावधान! एक छोटीशी चूक पडेल महागात
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
diy mosquito repellent
आता विसरा डासांचा त्रास! दिवसेंदिवस वाढणाऱ्या डासांचा ‘या’ सोप्या आणि स्वस्त घरगुती उपायांनी करा नायनाट
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
rto measures for safe travel on the Mumbai-Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावरील सुरक्षित प्रवासासाठी उपायांची जंत्री
Bike Driving Tips
Bike Driving Tips : जर प्रत्येक दुचाकी चालकाने ‘या’ पाच सवयी लावल्या तर कधीही होणार नाही अपघात
gas prevention tips in marathi
Gas Prevention Tips: ‘या’ पद्धतीने चवळी बनवल्यास गॅसपासून होईल सुटका? हा जुगाड खरंच काम करेल का? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

वाहन चालवताना काळजी घ्या

पावसाळ्यात टु व्हिलर चालवताना, आपला वेग नेहमी कमी ठेवणे सर्वात महत्वाचे आहे, कारण पावसात बाईक घसरण्याची शक्यता जास्त असते. याशिवाय जर मुसळधार पाऊस पडत असेल तर थोडा वेळ थांबा, कारण मुसळधार पावसात रस्त्यावर समोरचे काहीच दिसत नाही.

पाण्यातून बाईक नेऊ नका, पर्यायी रस्ते वापरा

पावसामध्ये टु-व्हिलरने ऑफिसला जाताना तो तुम्हाला थोडे स्मार्ट होण्याची आवश्यकता आहे. पावसामध्ये तुम्ही आपल्या ऑफिसला जाण्यासाठी असे रस्ते वापरा जिथे कमीत कमी खड्डे असतात किंवा साचलेले पाणी नसेल. असे केल्याने तुम्ही साचलेल्या पाण्यातील रस्त्यांवर दिसणाऱ्या खड्ड्यांना टाळून सुरक्षितपणे ऑफिसला जाऊ शकता. जर तुम्हाला आपल्या ऑफिसला जाण्यासाठी दुसरा कोणता रस्ता समजत नसेल तर तुम्ही गुगल मॅप्सचा वापर करा आणि जे तुम्हाला ट्रॅफिक रुटीनची माहिती मिळते.

हेही वाचा – दोन दिवसात काळी पडतात का केळी किंवा कोथिंबीर? पावसाळ्यात फळे-भाज्या साठवण्यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स

टु व्हिलर योग्य ठिकाणी पार्क करा

पावसात बाईक किंवा स्कूटर जास्त वेळ एका जागी ठेवणे योग्य नाही. तसेच, जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन चालवत असाल तर ते पाण्यापासून दूर ठेवण्यासाठी अधिक काळजी घ्या. तसेच, जर ती पार्क करायची असेल तर झाडे आणि मोठ्या वस्तू ज्या वाहनावर पडू शकतात त्यापासून दूर सुरक्षित ठिकाणी पार्क करा. लक्षात ठेवा की, टु व्हिलर नेहमी बाजूच्या स्टँडवर पार्क करा, जेणेकरून वजन समान रीतीने विभागले जाईल, कारण मधल्या स्टँडवर उभे केल्यास स्कूटर पडण्याची शक्यता जास्त असते.

स्कूटर- बाईक मेंटेनेन्स

टू व्हिलरमुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची मेंटेनेन्स ज्याचे महत्त्व पावसाळ्यात आणखी वाढते. जर तुम्ही आतापर्यंत बाईक किंवा स्कूटी सर्व्हिसिंग केलेली नाही तर तुम्ही सर्वात आधी हे काम करु शकता. पावसाळ्यात तुमच्या बाईकला कोणत्याही प्रकारची समस्या होणार नाही
पावसाळ्यात टु व्हिलरची काळजी घेण्याचा उत्तम उपाय म्हणजे खबरदारी घेणे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी त्याची सर्व्हिसिंग करून घ्या. सेवेदरम्यान केबल्स, चेन आणि टायर्सची कसून तपासणी करा. तसेच, दिवे, इंडिकेटर, हॉर्न, स्विच, कनेक्टर इत्यादी सर्व इलेक्ट्रिकल्स चांगल्या स्थितीत ठेवल्या आहेत याची खात्री करण्यासाठी तपासा. या गोष्टींकडे दुर्लक्ष करून पाणी मुरले तर मोठे नुकसान होते.

ब्रेकिंग सिस्टम


ब्रेकिंग सिस्टम बाईकच्या सुरक्षित प्रवासाचा एक महत्त्वपूर्ण हार्डवेअर असते ज्याचे एकदम व्यवस्थितपणे काम करते जे पावसळ्यात अत्यंत महत्त्वाचे असते. जर तुम्हाला तुमची बाईर किंवा स्कूटरचे ब्रेकचे घर्षण झाले असे तर तुम्ही आजच तुमच्या टुव्हिलरचे ब्रेक शू बदलून घ्या जेणेकरून पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर ब्रेक मारल्यानंतर तुमची बाईक व्यवस्थित काम करेल.

टायरची निवड

टु व्हिलरसाठी जितके ब्रेक महत्त्वाचे आहेत तितकाच महत्त्वाचा टायरही असतो जो घर्षणामुळे पावसाळ्यात नेहमी बाईक घसण्याचे कारण ठरतो. त्यामुळे टु व्हिलरचे टायर तपासून घ्या आणि जर त्याचे खूप घर्षण झाले असेल तर नवीन टायर टाका आणि रस्त्यावर बाईक चालवताना टायर व्यवस्थित काम करतो.

टाकीत पाणी असल्यास काय करावे?

मोटारसायकल रात्रभर पावसात कोणत्याही कव्हरशिवाय उभी राहिली किंवा खोल खड्ड्यात अडकली, त्यानंतरटु व्हिलर सुरू होणार नाही, अशी स्थिती असल्यास मेकॅनिकची मदत घ्या. अशा वेळी टु व्हिलर सुरू करण्याचा प्रयत्न करू नका, त्याऐवजी एखाद्या सर्व्हिस सेंटरला कॉल करा आणि तिथे घेऊन जा. कारण अशा परिस्थितीत अनेक वेळा इंधनाच्या टाकीत पाणी शिरते. अशा वेळी बाईक सुरू करण्याचा प्रयत्न केल्यास पाणी इंजिनपर्यंत पोहोचू शकते.

हेही वाचा – पावसाळ्यात साखर आणि मीठात ओलावा येऊ नये म्हणून वापरा ‘या’ सोप्या टीप्स

विमा असणे आवश्यक आहे

पावसाळा येण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या बाईक किंवा स्कुटरचा विमा उतरवा. त्याप्रमाणे दुरुस्तीसाठी होणारा खर्च एखाद्या व्यक्तीच्या बजेटपेक्षा जास्त असू शकतो. परंतु ते विम्याद्वारे संरक्षित केले जाऊ शकतात. काही विमा कंपन्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील करू शकतात, जी आजकाल एक सामान्य प्रथा आहे. त्यामुळे न विसरता प्रीमियम भरण्याचे लक्षात ठेवा.

Story img Loader