नऊ महिन्यांच्या कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच जन्मलेले अपत्य भविष्यात अंगकाठीने तंदुरुस्त झाले, तरी शैक्षणिक पातळीवर ते फारशी चमकदार कामगिरी करू शकण्याची शक्यता कमीच असते. अशा अकाली प्रसुती होऊन जन्मलेल्यांचे गणित कच्चे राहण्याची शक्यता असते, असे संशोधकांना आढळून आले. 
पूर्ण दिवस भरलेले आणि अकाली जन्मलेले अपत्य यांची शारीरिक वाढ बरेचवेळा सारखीच होत असते. मात्र, अकाली जन्मलेल्या मुला-मुलींचे गणित कच्चे राहण्याची शक्यता असते. त्याचबरोबर अशा मुलांची एकाग्रताही इतरांच्या तुलनेत कमी असते आणि हालचालींचा वेगही कमी असू शकतो, असे संशोधकांना आढळले.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधक नताशा अकशूमॉफ यांनी संदर्भात संशोधन केले. अकाली जन्मलेल्या मुला-मुलींच्या बौद्धिक आणि शारीरिक वाढीचा अभ्यास करण्यासाठी विद्यापीठाला पाच वर्षांसाठी अनुदान मिळाले. त्याच कार्यक्रमांतर्गत हे संशोधन करण्यात आले.
संशोधकांनी दिलेल्या निष्कर्षांच्या आधारे अमेरिकेत अकाली प्रसुती झालेल्यांसाठी विशेष शैक्षणिक कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. अकाली प्रसुती होऊन जन्मलेले अपत्य आणि त्यांची बौद्धिक क्षमता यांचा परस्पर संबंध असतो, असा निष्कर्ष संशोधकांनी लावला आहे.

Story img Loader