Yoga For Women : महिला अनेकदा घर आणि कुटूंब सांभाळताना स्वत:कडे लक्ष देत नाही.त्यामुळे त्यांना बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. घरची जबाबदारी, कुटूंब, कुटूंबातील सदस्यांची काळजी, कामाचा तणाव इत्यादी गोष्टींमध्ये महिला इतक्या व्यस्त असतात की स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात पण महिलांनी स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. ती निरोगी असेल तरच संपूर्ण घर निरोगी राहील. महिलांनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये नियमित व्यायाम आणि योगाचा समावेश करणे गरजेचे आहे.
सोशल मीडियावर महिलांसाठी खास योगा आणि व्यायाय सांगणारे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये प्रत्येक महिलेने दिवसातून दोन मिनिटे वेळ काढून केला पाहिजे असा योगा आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.
मुस्कान मित्तल या योग शिक्षिका यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी या खास योगा विषयी माहिती सांगितली आहे.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की मुस्कान मित्तल या समुद्र किनाऱ्यावर धावताना दिसत आहे.त्यानंतर त्या मलासन करत चालताना दिसत आहे. मलासन स्थितीत तुम्ही घरी किंवा घराबाहेर सुद्धा चालू शकता.याचे अनेक फायदे आहे. यामुळे महिलांची प्रजनन क्षमता वाढते. मासिक पाळी नियमित येते आणि या दरम्यान महिलांना कोणताही त्रास जाणवत नाही. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. याशिवाय हा व्यायाम केल्यामुळे लैंगिक उर्जा संतुलित राहते आणि तुम्ही भावनिकदृष्ट्या सक्षम राहता. भरपूर कॅलरी कमी होतात
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माझी आई नेहमी घरी फरशी पुसताना मलासन करत चालते.” तर एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली”
हेही वाचा : रात्री ब्रा काढून का झोपावे? महिलांनो, जाणून घ्या कारणे…
yogajourneywithmuskan या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जरी मलासन करत चालणे सोपी वाटत असले तरी हे तितके सोपी नाही. यासाठी तु्म्हाला नियमित सराव करावा लागेल.” मुस्कान मित्तल या अकाउंटवरुन अनेक योगा आणि शारीरिक आरोग्याशी संबंधित व्हिडीओ शेअर करत असतात.