शेंगदाणे हे अनेकांचा स्नॅक्समधील आवडता पदार्थ असतो. तळलेले किंवा खारे शेंगदाणे खाणे अनेकांना आवडते. जेवणामध्ये देखील अनेक पदार्थांमध्ये शेंगदाण्याचा समावेश असतोच. शेंगदाणे बारीक वाटून किंवा तसेच तळून अनेक खाद्यपदार्थांमध्ये वापरले जातात. याच्या सेवनाने आरोग्याला देखील अनेक फायदे मिळतात. हिवाळ्यात वातावरणात होणाऱ्या बदलामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते, अशात अनेक पोषक तत्त्व असणारे शेंगदाणे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते.
शेंगदाणे प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि शरीरासाठी उपयुक्त असणारे फॅट यांचे उत्तम स्त्रोत मानले जाते. यासह शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स, मॅक्रोन्यूट्रियंट्स, मायक्रोन्यूट्रिएंट्स व विटामिन आढळतात. त्यामुळे कच्चे किंवा भाजलेले कोणत्याही प्रकारे शेंगदाणे खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. हृदयाच्या आरोग्यापासून शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी अनेक गोष्टींसाठी शेंगदाणे खाणे फायदेशीर ठरते. आता सुरू झालेल्या हिवाळा ऋतूमध्ये शेंगदाणे खाणे कसे फायदेशीर ठरते जाणून घ्या.
आणखी वाचा : हिवाळ्यात मुलांना सतत सर्दीचा त्रास होतोय का? ‘हे’ घरगुती उपाय नक्की ठरतील फायदेशीर
हिवाळ्यात शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळतात हे फायदे
- शेंगदाण्यांमध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि हृदयाचे विकार होण्याची शक्यता कमी होते.
- शेंगदाण्यांमध्ये आढळणाऱ्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि अँटिऑक्सिडंटमुळे त्वचा स्वच्छ राहण्यास मदत मिळते.
- जेव्हा तुम्ही रोज शेंगदाणे खाता, तेव्हा शरीराला रोज पोषक तत्वांचा पुरवठा होण्याची सवय लागते, यामुळे मेंदू अधिक सक्रिय होतो.
- शेंगदाण्यांचा रोजच्या आहारात समावेश केल्यास लहान मुलांच्या योग्य वाढीसाठी आवश्यक असणारा प्रोटीनचा पुरवठा होण्यास मदत होईल.
- शेंगदाण्यांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत मिळते.
- मधुमेह असणाऱ्या व्यक्ती देखील त्यांच्या आहारात शेंगदाण्याचा समावेश करू शकतात कारण यामध्ये साखर नसते. अशाप्रकारे चवीबरोबरच आरोग्यासाठीही स्नॅक्ससाठीचा शेंगदाणे हा उत्तम पर्याय आहे.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहिती करिता तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)