सोशल मीडियावर सतत नवनवीन ट्रेण्ड्स येतच असतात. मग सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत आणि ब्रॅण्ड्सपासून सरकारी अकाऊण्ट्सपर्यंत सर्वच ठिकाणी या ट्रेण्ड्सची चर्चा होताना दिसते. मागील वर्षी चालू गाडीतून रस्त्यावर उतरून नाच करण्याचे ‘किकी चॅलेंज’ चांगलेच गाजले होते. त्यानंतर आता सोशल मीडियावर क्रेझ पाहायला मिळत आहे ती #10YearChallenge (१० इअर चॅलेंज) ची. गेल्या काही दिवसांपासून #10YearChallenge हा हॅशटॅग ट्रेण्ड होत आहे. या हॅशटॅगची भुरळ सर्वांनाच पडली आहे हे चॅलेंज नेमकं आहे तरी काय, त्याचे काय परिणाम दिसून येत आहेत, या चॅलेंजबद्दल कोणत्या गोष्टींचा काळजी घ्यायला हवी असा १० गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

#10YearChallenge चॅलेंज आहे तरी काय?

मुळात आज आपण सोशल मिडियाच्या जगात वावरतो असं म्हटल्यास हरकत नाही. म्हणजेच आपल्यावर सोशल मिडियावरील या ना त्या चॅलेंजचा सतत मारा होतो असतो. दरवर्षी अशी अनेक चॅलेंजेस व्हायरल होताना दिसतात. २०१९ हे नवीन वर्ष आत्ता कुठे सुरु झालय पण नवीन वर्षाच्या दुसऱ्या आठवड्यातच सोशल मिडियावर #10YearChallenge हे चॅलेंज व्हायरल झालं आहे. स्वत:चा दहा वर्षांपूर्वीचा आणि आताचा फोटो #10YearChallenge या हॅशटॅगअंतर्गत शेअर करून हे चॅलेंज स्वीकारलं जातं. २००९ आणि २०१९ अशा दोन्ही वर्षांतील फोटो शेअर करताना स्वत:मध्ये झालेल्या बदलांना सकारात्मकरित्या स्वीकारण्याचा उद्देश या आव्हानामागे आहे. आपल्यापैकी सर्वांच्या सोशल मिडिया टाइमलाइन मित्रमंडळींना टाकलेल्या या १० वर्षापूर्वीच्या आणि आत्ताच्या फोटोंनी भरल्या आहेत. पण या चॅलेंजकडे पाहाताना केवळ गंमत म्हणून पाहणे चुकीचे ठरु शकते हेही लक्षात घ्यायला हवे.

मानसिक आरोग्यासाठी धोकादायक

बर्डबॉक्स, किकी किंवा मोमो चॅलेंजसारख्या अनेक व्हायरल चॅलेंजेसवर जगभरातील देशांनी बंदी घातील आहे. ही व्हायरल चॅलेंजेस लोकांसाठी धोकादायक असल्याचे सांगत यावर स्थानिक प्रशासनाने बंदी घातली आहे. अनेकदा अशी सोशल चॅलेंजेस स्वीकारताना त्यातील गंमत आणि धोका यामधील फरक कळत नाही. अनेकदा अशा व्हायरल ट्रेण्डचा तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा दहा वर्षापूर्वीचे फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर १० वर्षांपूर्वी ती व्यक्ती कशी दिसत होती यावरुन येणाऱ्या कमेन्ट्समुळे नकारात्मक विचार करण्यास युझर्स सुरुवात करतात. त्यामुळे त्यांना स्वत:च्या दिसण्याबद्दल न्यूनगंड निर्माण होतो. अशा कमेन्टसमुळे अनेकांमध्ये आपल्यामध्ये काहीतरी कमी असल्याची भावना निर्माण होते. यामुळे मानसिक ताण, डोकेदुखी, उदासीनता, झोप न येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.

एफओएमओ

याचा अर्थ आहे फियर ऑफ मिसिंग आऊट. सर्वजण सोशल मिडियावर हे चॅलेंज स्वीकारत आहेत म्हणून आपणही ते स्वीकारावे नाहीतर आपण इतरांहून वेगळे पडू अशी भिती मनामध्ये निर्माण होते. सोशल मिडियावर सर्वाधिक अॅक्टीव्ह असणाऱ्या आणि सोशल मिडियावरील डिजीटल प्रोफाइलला खूपच महत्व देणाऱ्या तरुणांना अशा पद्धतीचे पिअर प्रेशर (समवयीन गटामुळे येणारा ताण) अधिक जाणवते.

#10YearChallenge कशासाठी

मुळात आत्ताचा आणि दहा वर्षांपूर्वीचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट करण्याच्या या चॅलेंजची सुरुवात कशी झाली हे नेमकेपणे सांगता येणार नाही. मात्र वरवर जरी हे चॅलेंज दशक संपत आल्यामुळे सुरु करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी मुळात मागील दहा वर्षांमध्ये वयाचा एखाद्याच्या दिसण्यावर कसा परिणाम झाला आहे हे दाखवण्याच्या उद्देशाने व्हायरल झाले आहे. अनेकांनी मी तेव्हा कसा दिसयचो आणि आता कसा दिसतो हे सोशल नेटवर्किंगवरील इतरांना दाखवण्यासाठी हे चॅलेंज स्वीकारले आहे. त्यामुळे अनेकांमध्ये अगदीच अनेपेक्षितरित्या बदल झाल्याचे दिसून येत असतानाच दुसरीकडे जुन्या फोटोंवरुन एखाद्याला मुद्दाम टार्गेट केले जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

ही बातमी वाचली का >> आयसीसीनेही स्वीकारले #10YearChallenge म्हणते, ‘सदाबहार धोनी… १० वर्षात जराही नाही बदलला’

#10YearChallenge मागे फेसबुकचा हात?

एका अंदाजानुसार ५० लाखहून अधिक नेटकऱ्यांनी आत्तापर्यंत आपले दहा वर्षांपूर्वीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर अपलोड केले आहेत. पण या चॅलेंजमागे फेसबुकचा एक छुपा अजेंडा असल्याचे मत तंत्रज्ञान क्षेत्रातील काही तज्ञांनी व्यक्त केले आहे. #10YearChallenge व्हायरल झाल्यानंतर तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ञांनी या चॅलेंजमागील उद्देशांबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अनेकांच्या मते फेसबुकने मुद्दाम हे चॅलेंज व्हायरल केले आहे. या चॅलेंजच्या माध्यमातून फेसबुकला आपल्या युझर्सचा डेटा गोळा करण्यात रस असल्याचे या तज्ञांचे म्हणणे आहे. दहा वर्षांपूर्वीचे आणि आत्ताचे फोटो हे फेसबुकच्या आगामी फेस रिकग्नेशन सॉफ्टवेअरसाठी तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारीत मशीन लर्निंगसाठी वापरण्यात येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याशिवाय फेसबुक हा डेटा थर्ड पार्टी अॅप्लिकेशन्सला विकणार असल्याचीही शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

ही बातमी नक्की वाचा: व्हायरल झालेल्या #10YearChallenge मधील फोटोंचा ‘या’ गोष्टीसाठी होणार वापर

सेलिब्रिटींजनेही स्वीकारले चॅलेंज

अनेक सेलिब्रिटींने हे व्हायरल चॅलेंज स्वीकारले आहे. हॉलिवूड सेलिब्रिटीजने हे चॅलेंज स्वीकारण्यास सुरुवात केल्यानंतर अगदी करण जोहर, सोनम कपूर, बिपाशा बासू, दिया मिर्झा, विशाल दादलानी, पद्म लक्ष्मी, जेसिका बेलसारख्या अनेकांनी हे चॅलेंज स्वीकारत आपले दहा वर्षांपूर्वीचे फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत. काही सेलिब्रिजीटने त्यांच्यामध्ये झालेला बदल सकारात्मक असून तुमच्याही आयुष्यात असाच सकारात्मक बदल होत रहावो असं म्हटलं आहे. एका प्रकारे केवळ चॅलेंज न स्वीकारता त्यामाध्यमातून सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सेलिब्रिटीजने केला आहे.

नक्की वाचा >> सेलिब्रिटींना पडली #10YearChallenge ची भुरळ, पाहा त्यांनी पोस्ट केलेले फोटो

त्यात वाईट वाटण्यासारखे काहीच नाही

एकीकडे हे चॅलेंज स्वीकारताना दुसरीकडे हे केवळ सोशल नेटवर्किंगवरील चॅलेंज आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. यामध्ये जास्त अडकून न पडता, त्यावरील कमेन्टला जास्त महत्व न देता केवळ गंमत म्हणून याकडे पाहिले पाहिजे. १० वर्षांमध्ये तुमच्या दिसण्यात झालेला बदल सकारात्मक असो किंवा नकारात्मक तो चांगल्याच अर्थाने स्वीकारणे गरजेचे आहे. तुमचे वजन वाढणे, कमी होणे, दिसण्यामध्ये बदल होणे या सर्व नैसर्गिक प्रक्रिया असून त्याबद्दल वाईट वाटण्यासारखे काहीच नाही हे लक्षात घेणे खूप गरजेचे आहे.

या सर्वांकडे गांभीर्याने बघण्याऐवजी…

सकारात्मक असो किंवा नकारात्मक तुमच्यावर इंटरनेटवरील व्हायरल गोष्टींचा परिणाम होतोच. यामधून #10YearChallenge ही सुटलेले नाही. एखाद्यामधील बदल सकारात्मक उर्जा देतो तर काही गोष्टींचा एखाद्यावर वाईट परिणाम होतो. सायबर बुलींग म्हणजेच इंटरनेटवर होणारी दादागिरी आणि ट्रोलिंगच्या जमान्यामध्ये सर्वच गोष्टींकडे जास्त गांभीर्याने बघण्याऐवजी त्याकडे साकारात्मक दृष्टीकोनामधून पहायला हवे. अनेकजण तर या ट्रेण्डच्या माध्यमातून व्हायरल होत असणारेे फोटो गंमत म्हणून स्टेसबस्टर्स म्हणून वापरताना दिसत आहेत.

हेही पाहा>> #10YearChallenge: कवट्या महाकाळ, ईशा निमकरपासून माल्यापर्यंत; पाहा व्हायरल मिम्स

सर्वजण करता म्हणून तुम्हीही केले पाहिजे असं काही नाही

अनेकदा अशा चॅलेंजसमध्ये तुलना केली जाते. तो कसा दिसायचा मी कसा दिसतो अशी तुलाना होणे सहाजिक आहे तरी दोन व्यक्तींमधील बदल सारखेच असतील असं नाही हे समजून घेणे गरजेचे आहे. कोणीतरी दहा वर्षांनंतर अगदी सुंदर दिसत असेल तर याचा अर्थ तुम्ही तेव्हा कुरुप दिसत होता असा होत नाही. शेवटी हे एक व्हायरल चॅलेंज आहे ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सर्वजण सोशल मिडियावर हे चॅलेंज स्वीकारत आहेत म्हणून तुम्हीही तुमचे फोटो सोशल मिडियावर अपलोड कारायलाच हवे असं नाही.

मानसिक स्वास्थ महत्वाचे

#10YearChallenge असो किंवा सोशल मिडियावरील इतरही कोणते चॅलेंज असो त्यासाठी आपले मानसिक स्वास्थ धोक्यात टाकणे चुकीचे आहे. अशाप्रकारच्या मानसिक तणावाचा दूरोगामी परिणाम होऊ शकतो. अती विचारामुळे अनेकदा अस्वस्थता, तणाव, मानसिक ताण येणे अशा स्वरुपाचे आजार होऊ शकतात. इच्छा नसतानाही अशा चॅलेंजमध्ये सहभागी होणे धोक्याचे ठरु शकते.

Story img Loader