जेव्हा तुमच्या जोडीदारासोबत ब्रेकअप होतं, तेव्हा तुम्हाला त्याच्यापासून दूर राहणं आवडतं. त्याच्याशी संबंधित सर्व चॅट्स, मेसेज आणि फोटो डिलीट करा, जेणेकरून एक्स पासून अंतर राहील आणि त्याला विसरणं सोपं जाईल. पण आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा तुम्हाला जुन्या जोडीदाराचा सामना करावा लागतो, अशा परिस्थितीत अनेकांना ही परिस्थिती हाताळता येत नाही.

ऑफिसमध्ये एक्ससोबत कसं डील करावं?
कधी कधी आयुष्य तुम्हाला अशा वळणावर आणतं जेव्हा तुम्हाला एक्ससोबत एकाच ऑफिसमध्ये काम करावं लागतं. कारण तुमच्या ऑफिसमध्ये अचानक जुन्या जोडीदाराची जॉइनिंग होते. असा प्रश्न तुमच्यासमोर आला तर परिस्थिती कशी हाताळायची?

१. ऑफिसमध्ये रिलेशन उघड होऊ देऊ नका
जर इतरांना या नात्याबद्दल माहिती नसेल तर ते गुप्त राहू देणे चांगले आहे. बाकी ऑफिसच्या सहकाऱ्यांशी चर्चा केली तर तो विनाकारण गॉसिपचा विषय बनेल. जुने नाते जितके गुप्त राहिल तितके चांगले.

२. आव्हानापासून पळ काढू नका
जर तुम्हाला ऑफिसमध्ये एक्सला सामोरे जावे लागत असेल तर या आव्हानापासून पळ काढू नका, तर आरामात सामोरे जा. सर्वोत्तम मार्ग म्हणजे शक्य तितके सामान्य वागण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे असं शो करा की आधी काही झाले नाही.

आणखी वाचा : Skin Care : उन्हाळ्यात चेहऱ्यावरील काळे डाग कसे घालवायचे? या दोन हिरव्या पानांपासून बनवा आइसक्यूब

झालं गेलं गंगेला मिळालं
तुम्ही दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्यापासून तुम्हाला एकमेकांच्या खाजगी गोष्टी माहीत असतीलच, पण जुन्या गोष्टींवर कधीही चर्चा करू नका, असं केल्यानं दोघांच्या जुन्या जखमा ताज्या होतील. यापेक्षा उत्तम आहे की चांगल्या कलीगप्रमाणे नव्याने सुरुवात करणे चांगले.

एकत्र काम न करण्याचा प्रयत्न करा
जर तुम्ही दोघांना एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा ग्रूपमध्ये काम करण्यासाठी दिलं असेल, तर त्याच कार्यालयात इतर पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा, ज्यासाठी अधिक संवाद आवश्यक असेल आणि अनावश्यक संघर्ष टाळा.

एक्सच्या विनोदांकडे दुर्लक्ष करा
जर तुमचा एक्स पाय ओढण्याचा किंवा खेचण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्या विनोदांवर हसणं टाळा. अशा विनोदांकडे दुर्लक्ष करणं चांगलं आहे. कारण राग आल्याने परिस्थिती आणखी बिघडू शकते.