योग्य उत्पादने निवडण्यापासून ते केसांची काळजी घेण्याच्या नियमानुसार नीट पालन करण्यापर्यंत, केसांना निरोगी आणि चमकदार कसे ठेवावे ?बद्दल अनेकदा प्रश्न पडतो. तथापि, एक प्रश्न जो अनेकदा आपल्या सर्वांना त्रास देतो, तो म्हणजे आपण आपले केस आठवड्यात नक्की ती वेळा धुवावेत?
काही लोक दररोज केस धुण्यास प्राधान्य देतात, तर काही खूप दिवसांनी धुतात. जर तुम्ही तुमच्या केस धुण्याच्या दिनचर्येबद्दल संभ्रमात असणाऱ्यांपैकी असाल, तर त्वचाशास्त्रज्ञ डॉ. जुश्या भाटिया सरीन यांनी अलीकडेच, तुमच्या केसांच्या प्रकारावर आधारित किती वेळा केस योग्य धुवावे हे सांगणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
त्वचारोगतज्ज्ञांनी सांगितले की एखादी व्यक्ती आपले केस किती वेळा धुवते ही एक अतिशय वैयक्तिक निवड आहे. “बहुतेक लोकांना दररोज किंवा प्रत्येक इतर दिवशी केस धुण्याची गरज नसते.”योग्य शॅम्पू निवडण्याच्या गरजेवर भर देताना डॉ सरीन म्हणाले, “जर तुमच्या डोक्यात कोंडा किंवा टाळू खूप तेलकट असेल आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला अस्वस्थ करत असेल तर तुम्ही दररोज तुमचे केस धुवू शकता. जर तुम्ही दररोज तुमचे केस धुता तर योग्य शॅम्पू निवडणे अधिक महत्त्वाचे आहे. ”
त्वचारोग तज्ञांच्या मते, तेलकट टाळू असलेले लोक दररोज शॅम्पू करू शकतात आणि कोरडे टाळू असलेले लोक आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा धुवू शकतात.