व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी एक आवश्यक पोषक तत्व आहे ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत होतात. आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी अशा झाल्या आहेत की बहुतेक लोकांच्या शरीरात या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता भासू लागली आहे. आपण सूर्यप्रकाश टाळतो, वातानुकूलित खोल्यांमध्ये तासनतास घालवतो, आहारात व्हिटॅमिन डी असलेले पदार्थ खात नाही, त्यामुळे शरीरात या आवश्यक जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करते जे मजबूत हाडांसाठी आवश्यक आहे.
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो. हाडे आणि स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवते. महिलांमध्ये या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे पाठदुखीची समस्या वाढते. शरीरातील व्हिटॅमिन डी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी काही लोक व्हिटॅमिन डी आहार घेतात, तसेच व्हिटॅमिन डी पूरक गोळ्या घेतात.
( हे ही वाचा: टाइप १ मधुमेहाच्या रुग्णांमध्ये इन्सुलिनमुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो का? जाणून घ्या तज्ञांकडून)
आपल्या सर्वांना एका दिवसात ६०-१०००IU व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते, परंतु काही लोक हे जीवनसत्व आवश्यकतेपेक्षा जास्त वापरण्यास सुरवात करतात. तुम्हाला माहित आहे की व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन शरीराला हानी पोहोचवू शकते. व्हिटॅमिन डीच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर कोणते दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊया.
पचनावर परिणाम होऊ शकतो
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेतल्याने पचनसंस्थेला हानी पोहोचते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेतल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डी घेतल्याने पोटदुखी, भूक न लागणे, मळमळ होऊ शकते.
(हे ही वाचा: Blood Sugar: मधुमेहाच्या रुग्णांनी शरीरामध्ये होणाऱ्या ‘या’ बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नये)
मेंदूवर देखील परिणाम होऊ शकतो
जास्त प्रमाणात व्हिटॅमिन डीचे सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. तुम्हाला थकवा आणि मानसिक त्रास जाणवू शकतो. व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्याने तुमच्या मानसिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो.
गोंधळ वाढू शकतो
व्हिटॅमिन डीचे जास्त सेवन केल्यास निर्णय घेण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. जे लोक जास्त व्हिटॅमिन डी घेतात ते सहसा गोंधळलेले असतात.
जास्त तहान लागणे
शरीरात व्हिटॅमिन डीचे प्रमाण अधिक असल्याने तहान अधिक लागते आणि मानवांमध्ये डिहायड्रेशनचा धोका वाढू लागतो.