Excessive Thirst Reasons : तहान लागणे हे उत्तम आरोग्याचे लक्षण मानले जाते. कारण तहान लागत आहे याचा अर्थ शरीराच्या हालचालीमुळे शरीर अधिक पाण्याची मागणी करत आहे ज्यामुळे हायड्रेटेड राहण्यास मदत मिळते. परंतु सतत तहान लागणे हे चांगली गोष्ट नाही. सतत तहान लागणे काही गंभीर आजारांची लक्षणं असु शकतात. त्यामुळे जर तुम्हाला सतत तहान लागत असेल तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. सतत तहान लागणे कोणत्या आजाराची लक्षण असु शकतात जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिहायड्रेशन (Dehydration)

डिहायड्रेशन ही आरोग्याशी जोडलेली एक समस्या आहे. यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. डिहायड्रेशन झाल्यास चक्कर येणे, उल्टी येणे, डोकेदुखी असा त्रास होऊ शकतो.

आणखी वाचा : सतत नसांमध्ये वेदना जाणवतात का? ‘या’ पाच फळांचे सेवन करा; नक्की मिळेल आराम

मधूमेह (Diabetes)
सतत तहान लागत असल्यास त्या व्यक्तीला मधूमेह झाल्याची शक्यता आहे. ज्याला ‘अक्स शुगर’ देखील म्हटले जाते. मधुमेहाचे असे दोन, तीन प्रकार आहेत. ज्यामध्ये शरीरातील द्रवपदार्थांचे नीट नियमन होत नाही आणि शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. तुम्हाला कोणत्या प्रकारचा मधुमेह झाला आहे ते टेस्टद्वारे स्पष्ट होईल. त्यानुसार त्यावर उपचार करता येईल.

ड्राय माऊथ (Dry Mouth)
जेव्हा तोंडातील ग्रंथी योग्य प्रकारे लाळ तयार करत नाहीत, तेव्हा ड्राय माऊथ म्हणजेच तोंड कोरडे पडण्याची समस्या उद्भवते. त्यामुळे तोंडातून दुर्गंधी येणे, ओठ दातांना चिकटणे असा त्रास होतो.

ॲनिमिया (Anemia)
शरीरातील लाल रक्तपेशी कमी झाल्यामुळे ॲनिमिया म्हणजेच अशक्तपणा हा आजार होतो. या अवस्थेला शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होणे असे देखील म्हटले जाते. अशक्तपणामुळे फारशी तहान लागत नाही, पण जसजसा आजार बळावतो तसतशी सतत तहान लागायला सुरूवात होते, त्यामुळे वेळीच याची टेस्ट करून घेणे आवश्यक आहे.

Body Pain Causes : तुम्हाला सतत अंगदुखी जाणवते का? जाणून घ्या यामागचे कारण

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Excessive thirst can be the symptoms of these severe diseases know more pns