दररोज व्यायाम लक्षणीयरित्या स्मृतिभ्रंशाचा धोका कमी करु शकतो असे एका अभ्यासातून समोर आले आहे.
नियमित व्यायाम, धुम्रपान न करणे, संतुलित वजन, आरोग्यपूर्ण आहार आणि कमी मद्यार्क घेणे हे पाच निरोगी राहणाचे पर्याय असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. निरोगी जीवन जगण्यासाठी या पाच गोष्टींचे आचरण करणे महत्वाचे ठरते. या पाच गोष्टींचे नियमीत आचरण करणाऱया व्यक्तींना स्मृतिभ्रंशाचा धोका कमी असतो. यात नियमित व्यायाम करणे हा त्यातील महत्वाचा घटक आहे. व्यायामातून अनेक आजारांवर मात करता येते किंवा निरोगी राहण्यासाठी व्यायाम हा उत्तम उपाय असल्याचे याआधीही समोर आले आहे.
मधुमेह, हृदयविकार असलेल्या व्यक्तींनाही नियमित व्यायाम करण्याचा सल्ला देण्यात येतो. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, २०५० सालापर्यंत जगातील स्मृतीभ्रंशाने बाधित लोकांचा आकडा १३.५ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नियमित व्यायाम करणे हा त्यावर उत्तम उपाय असल्याचेही संशोधकांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा